ट्वीटवरून माहिती देणार्या हिंदु विद्यार्थिनीला पितळीचा हिजाब घालण्याची धर्मांध विद्यार्थ्याची धमकी
राज्यातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विद्यापिठामधून होणारा हिंदू विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी तेथे प्रशासक नेमावा, असेच हिंदूंना वाटते !
अलीगड (उत्तरप्रदेश) : येथील अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील वसतीगृहामध्ये हिंदु विद्यार्थिनींवर हिजाब घालण्यासाठी दबाव आणला जातो, अशी माहिती एका हिंदु विद्यार्थिनीने ट्वीट करून दिली. या ट्वीटला या विश्वविद्यालयातील एका धर्मांध विद्यार्थ्याने प्रत्युत्तर देत ‘दळणवळण बंदी उठल्यानंतर इंशाअल्ला तुम्हालाही हिजाब घालायला लावण्यात येईल आणि तोही पितळीचा असेल’, अशा शब्दांत धमकी दिली. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह टिपण्या केल्या. यामुळे घाबरलेल्या या विद्यार्थिनीने विश्वविद्यालयाचे प्रशासन आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला, तर विश्वविद्यालयाने चौकशी समिती नेमली आहे. अलीगडच्या माजी महापौर शकुंतला भारती यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
विश्वविद्यालयाचे प्राध्यापक मुफ्ती जाहिद यांनी म्हटले की, ‘जर एखाद्या मुसलमान विद्यार्थ्याने मुसलमान विद्यार्थिनीला हिजाब घालण्यास सांगितले, तर त्याच चुकीचे काही नाही; मात्र त्याने मुसलमानेतर मुलीला असे सांगितले, तर ते अयोग्य आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात