Menu Close

‘हिंदु’ नावाच्या बनावट खात्यावरून अग्रिमा जोशुआ हिला बलात्काराची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांधाची बनवेगिरी जाणा !

मुंबई : सामाजिक प्रसारमाध्यमावर ‘उमेशदादा’ या नावाने बनावट खाते उघडून त्यावरून हास्यकलाकार अग्रिमा जोशुआ हिला बलात्काराची धमकी देणार्‍या इम्तियाज शेख याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

इम्तियाज याने सामाजिक माध्यमांवर ‘उमेशदादा’ नावाच्या खात्यावरून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये त्याने अग्रिमा हिच्याविषयी अश्‍लील वक्तव्यही केले आहे. हास्यकलाकार अग्रिमा जोशुआ हिने एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विनोदात्मक टिपणी करून अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याविषयी शिवप्रेमींकडून अग्रिमा हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सामाजिक प्रसारमाध्यमांवरूनही अग्रिमा हिचा निषेध करण्यात येत आहे. याचा अपलाभ घेऊन इम्तियाज याने हा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता. इम्तियाज याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ‘ट्वीट’द्वारे दिली आहे. ‘महिलांना धमकी द्याल, तर कारागृहात जाल’, असे या ‘ट्वीट’मध्ये पोलिसांनी म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *