गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमधील विविध चित्रपट, वेबसिरीज, यू-ट्यूब यांद्वारे सातत्याने हिंदु धर्माला लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे शेकडो चित्रपट प्रदर्शित झाले; मात्र त्याविषयी कधीच बंदीची मागणी केली गेली नाही. याउलट ‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारणावर लगेच बंदीची मागणी केली जाते. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एकाच धर्माला लागू आहे का ? हिंदूंच्या धार्मिक भावनांची कोण दखल घेणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी, झी 5 यांच्यासारख्या ‘ओटीटी अॅप्स’द्वारा प्रसारित होणार्या वेबसीरिजच्या माध्यमातून सातत्याने हिंदु संस्कृती, धर्म, देवता, संत यांचाच अपमान केलेला आढळतो. बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्षे असणारी घराणेशाही, हिंदु अभिनेत्यांना जाणीवपूर्वक डावलणे, हिंदुविरोधी चित्रपटांची निर्मिती चालू असून या माध्यमातून जे हिंदुविरोधी षड्यंत्र गेली अनेक वर्षे चालू आहे ते उघड करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे रविवार, 19 जुलै या दिवशी सायंकाळी 7 ते 8.30 या वेळेत ‘फेसबूक’, ‘यू-ट्यूब’ आणि ‘ट्विटर’ यांद्वारे थेट प्रसारण (Live) केले जाणार आहे.
@HinduJagrutiOrg आयोजित
विशेष संवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र कीविषय : हिन्दू विरोधी बॉलिवुड का पर्दाफाश !
वक्ता :
? अधिवक्ता सुभाष झा
? पायल रोहतगी
? @Rajput_Ramesh
? @Ramesh_hjs19 जुलाई 2020 | शाम 7 से 8.30
Live :
https://t.co/jzKtZmMgqf
https://t.co/oMnCePYQ8Y pic.twitter.com/ngJi0rCLPH— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) July 18, 2020
‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या अंतर्गत आयोजित ‘हिंदुविरोधी बॉलिवूडचा पर्दाफाश !’ या विशेष संवादामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा, बॉलिवूडच्या घराणेशाहीवर सडेतोड विचार मांडणारी अभिनेत्री पायल रोहतगी, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता श्री. रमेश सोळंखी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक श्री. विनय धुमाळे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे संबोधित करणार आहेत. तरी याचा राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या विशेष संवादाचे थेट प्रसारण पुढील ‘लिंक्स’वरून केले जाणार आहे :
Facebook.com/HinduAdhiveshan
Youtube.com/HinduJagruti
Twitter.com/hindujagrutiorg