Menu Close

चीनमधील जगातील सर्वांत मोठ्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणाला अतीवृष्टीमुळे तडा जाण्याची शक्यता

धरण फुटले, तर चीनचा होऊ शकतो विनाश

दुसर्‍यांचा विनाश करण्याची महत्त्वाकांक्षा बाळणार्‍या चीनला निसर्ग जर अशा पद्धतीने धडा शिकवणार असेल, तर जगाला कधीतरी चीनविषयी सहानुभूती वाटेल का ?

बीजिंग (चीन) : सध्या चीनमधील अनेक राज्यांमध्ये अतीवृष्टीमुळे पूर आला आहे. त्यातच जगातील सर्वांत मोठे धरण असलेले ‘थ्री गॉर्जेस’ हेही पावसामुळे भरले आहे. यातील पाणी सोडण्यात आल्याने अनेक राज्यांत पूर आला आहे. यात कोरोनाची उत्पत्ती झालेल्या वुहानमध्येही पूर आला आहे. तेथील प्रयोगशाळा अन् मांस बाजार पाण्याखाली गेले आहेत.

१. काही दिवसांपूर्वी महापुरामुळे थ्री गॉर्जेस धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्या वेळी चीनने ती अफवा असल्याचे म्हटले होते. आता चीनमधीलच काही पर्यावरणवादी या धरणाविषयी चिंता व्यक्त करत आहेत. हे धरण बांधल्यानंतर प्रथमच या धरणातील जलसाठा सर्वाधिक पातळीवर गेला आहे. जर या धरणाला छोटासा जरी तडा गेला, तरी चीनची अनेक शहरे एकाच वेळी पाण्याखाली जातील.

२. वुहानपासून हे धरण ३०० किलोमीटर लांब अंतरावर आहे; मात्र तरीसुद्धा या धरणाचे काही दरवाजे उघडल्यामुळे वुहानमध्ये महापूर आला. यावरून ‘हे धरण चीनमध्ये विनाश घडवू शकतो’, असे सांगितले जात आहे.

३. हे धरण २ सहस्र ३०९ मीटर लांब आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस चालूच राहिला, तर हे धरण किती काळ पाण्याचा दबाव सहन करील, याविषयी स्थानिकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यातूनच गेल्या आठवड्यात या धरणाचे काही दरवाजे उघडले गेले; मात्र यातून पाण्याचा जेवढा विसर्ग होत आहे, तितकेच पाणी काही घंट्यांत सतत चालू असणार्‍या पावसामुळे भरत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *