Menu Close

पाकच्या सिंधमध्ये २ हिंदु तरुणांची हत्या : अर्धवट जळालेले मृतदेह आढळले

पाकमधील हिंदूंची ही दयनीय स्थिती भारतासह जगातील बहुतेक देशांना दिसत असूनही ते यावर गांधीवादी मौन बागळून आहेत. भारताने तरी याविषयी आवाज उठवणे अपेक्षित आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर अशा घटना जगातील कुठल्याच देशात घडू दिली जाणार नाही !

मिटियारी हाला (पाकिस्तान) : पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना चालू आहेत. येथील मिटियारी हाला भागात मोहन बागरी नावाच्या हिंदु तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. याविषयीची माहिती पाकमधील सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केली. अधिवक्ता ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, ‘मोहन याची जीभ कापण्यात आली आणि नंतर त्याला ठार करून जाळण्यात आलेे.’

सिंधमधील उमरकोट येथे सुनील कुमार याचेही शव वाईट स्थितीत सापडले आहे. त्यालाही ठार मारून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला गेला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *