Menu Close

पाकिस्तान : ४०० हून अधिक मंदिरांच्या ठिकाणी दुकाने, कार्यालये किंवा मदरसे बनवले गेले

प्रतीवर्षी १ सहस्रहून अधिक मुलींचे होते अपहरण, धर्मांतर आणि विवाह

  • पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची विदारक स्थिती !
  • पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य असलेल्या हिंदूंच्या स्थितीविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, बुद्धीजिवी आणि प्रसारमाध्यमे काही बोलतील का ?
  • भारतातील मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, तसेच अल्पसंख्यांक यांच्याविषयी जरा कुठेही काही घडले, तर त्याविषयी अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक आयोग आगपाखड करतो. पाकिस्तानमधील हिंदु मंदिरे आणि हिंदू यांच्याविषयी तो काही बोलेल का ? कि अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणामुळे गप्प बसणार ?
  • पाकमधील हिंदु मंदिरे आणि हिंदू यांची स्थिती पहाता भारतात हिंदु राष्ट्र किती आवश्यक आहे, हेच लक्षात येते !

नवी देहली : ‘धर्म ही व्यक्तीची खासगी गोष्ट आहे, याच्याशी मी सहमत नाही. तसेच एका मुसलमान राष्ट्रात सर्वांना समान अधिकार मिळावेत, हेही मला मान्य नाही. मग त्याचा धर्म, जात, श्रद्धा काहीही असो’, असे विधान पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ख्वाजा नजीमुद्दीन यांनी केले होते. नजीमुद्दीन महंमद अली जिना यांचे निकटचे सहकारी होते. हा संदर्भ देण्याचे कारण की, ‘ऑल पाकिस्तान हिंदू राईट्स मुव्हमेंट’च्या सर्वेक्षणानुसार फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये ४२८ मंदिरे होती. १९९० च्या दशकानंतर त्यातील ४०८ मंदिरांच्या ठिकाणी दुकाने झाली किंवा उपहारगृह, हॉटेल्स, कार्यालये, सरकारी शाळा किंवा मदरसे उघडण्यात आली. यावरून पाकिस्तानची तेव्हाची आणि आताची स्थिती काय असेल, हे लक्षात येते.

पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची विदारक स्थिती

१. अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजधानी इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिर उभारण्याची मान्यता दिली होती. त्यासाठी पाक सरकारने १० कोटीही दिले होते. ते इस्लामाबादचे पहिलेच मंदिर असते. २० सहस्र चौरस फुटामध्ये बनणार्‍या या मंदिराची भिंत बांधणे चालू होते; परंतु काही कट्टरतावादी धर्मांधांनी ती तोडली. दोन दिवसांपूर्वीच कट्टरतावाद्यांच्या चेतावणीमुळे सरकारने या मंदिराच्या निर्मितीला बंदी घातली.

२. ‘ऑल पाकिस्तान हिंदू राईट्स मुव्हमेंट’च्या सर्वेक्षणानुसार सरकारने अल्पसंख्यांकांच्या पूजास्थळांच्या १.३५ लाख एकर भूमी ‘इव्हॅक्यूई प्रापर्टी ट्रस्ट बोर्ड’ला लीजवर दिली आहे. ‘विस्थापितांच्या भूमी कह्यात घेणे’, हेच या ट्रस्टचे काम आहे.

३. पाकिस्तानमध्ये काली बाडी मंदिर होते. ते दारा इस्माइल खान याने खरेदी केले. त्यानंतर या मंदिराचे ताजमहाल हॉटेलमध्ये रूपांतर केले. रावळपिंडीमध्ये एक मंदिर पाडून तेथे व्यावसायिक कॉम्प्लेक्स बांधण्यात आले. केवळ हिंदूंचेच मंदिरे नाही, तर शिखांचे गुुरुद्वारे तोडून तेथेही दुकाने उघडण्यात आली आहेत.

४. पाकिस्तान सरकारच्या सर्वेक्षणानुसार वर्ष २०१९ मध्ये सिंध प्रांतात ११, पंजाबमध्ये ४, बुलचिस्तानमध्ये ३ आणि खैबर पख्तूनख्वाह येथे २ मंदिरे चालू आहेत.

५. फाळणीनंतरच मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. वर्ष १९९२ मध्ये भारतात बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात १०० हून अधिक मंदिरे तोडण्यात आली किंवा त्यांची नासधूस करण्यात आली.

६. मागील वर्षी एप्रिलमध्ये पाकच्या इम्रान सरकारने ४०० मंदिरांना पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये सियालकोटमध्ये १ सहस्र वर्षे पुरातन ‘शिवाला तेजा मंदिर’ उघडण्यात आले. हे मंदिर स्वातंत्र्यापासून बंद होते. वर्ष १९९२ मध्ये या मंदिराचीही नासधूस करण्यात आली होती. त्याच्या नूतनीकरणासाठी ५० लाख व्यय करण्यात आले आहेत.

पाकिस्तानमधील लोकसंख्येची वेगवेगळी आकडेवारी

१. पाकिस्तानमध्ये वर्ष १९९८ आणि वर्ष २०१७ मध्ये जनगणना झाली. यात धर्मानुसार माहिती उघड करण्यात आली नाही.

२. पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार वर्ष १९९८ मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या १३ कोटी २३ लाख होती. त्यात

२१ लाख ११ सहस्र हिंदु होते. वर्ष २०१७ मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी ७७ कोटींहून अधिक झाली.

३. वर्ष २०१७ मध्ये पाकिस्तानच्या सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार वर्ष १९९८ प्रमाणे हिंदूंची लोकसंख्या १.६ टक्के म्हणजे ३० लाख सांगितली.

४. पाकिस्तानी ‘हिंदु कौन्सिल’च्या मते तेथे ८० लाखांहून अधिक हिंदू लोकसंख्या आहे आणि ९४ टक्के हिंदू पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रहातात.

पाकिस्तानमध्ये १४ लाख ९८ सहस्र हिंदु मतदार

पाकिस्तानमध्ये अनुमाने ३ टक्के मुसलमानेतर मतदार आहेत. ही संख्या तेथील राजकारणावर परिणाम करते. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानुसार तेथे १०.५९ कोटींहून अधिक मतदार आहेत. त्यापैकी २९ लाख ९७ सहस्र मतदार अल्पसंख्यांक समाजाचे आहेत. वर्ष २०१७ पर्यंतच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात १४ लाख ९८ सहस्र हिंदु मतदार होते, तर १३ लाख २५ सहस्र ख्रिस्ती मतदार होते.

पाकिस्तानमध्ये प्रतिवर्षी १ सहस्रहून अधिक मुलींचे होते धर्मांतर !

‘युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजिअस’ संस्थेच्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये प्रतीवर्षी १ सहस्रहून अधिक मुलींचे अपहरण केले जाते. त्यांच्यावर बलात्कार होतो, त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले जाते आणि नंतर त्यांचा एखाद्या धर्मांधाशी विवाह लावून दिला जातो. यात बहुतांश हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचा समावेश असतो.

पाकिस्तानमध्ये हिंदूंना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा नसल्याने करावे लागत आहेत दफन !

पाकिस्तानात स्मशानभूमीसाठी मृत हिंदूंवर शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतीही भूमी नसल्याने हिंदूंना मृतदेह पुरण्यास भाग पाडले जात आहे. हिंदु धर्मातील मूलभूत विधींचा हा शेवटचा संस्कार आहे. शीख आणि जैन धर्मांतही दफन करण्यापेक्षा प्रेतावर चिता रचून अंत्यसंस्कार करणे, हा संस्कार आहे; मात्र तसे करण्यासाठी पेशावरमध्ये जागा नाही.

१. पाकिस्तानात हिंदूंची धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली आणि तेथे सार्वजनिक शौचालये अन् मदरसे बांधण्यात आली. हिंदू जिवाच्या भीतीमुळे या विरोधात आवाज उठवू शकत नाहीत, तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते संघर्ष करत आहेत.

२. खैबर पख्तूनख्वाहमधील हिंदूंना पुष्कळदा अग्नीसंस्काराऐवजी मृतदेह पुरण्यास भाग पाडले जाते. नौथिया भागात हिंदु आणि शीख कुटुंबीय अन् समाजातील सदस्य यांनी निधीअभावी अंत्यसंस्कारासाठी शव स्मशानभूमीत नेण्यात अपयशी ठरल्यानंतर मोठ्या संख्येने मृतदेह पुरले.

३. पेशावरमधील हिंदू आणि शीख यांनी त्यांच्या नातेवाइकांचा अंतिम संस्कार करण्यासाठी सरकारला स्मशानभूमीसाठी भूमी देण्याचे आवाहन केले आहे. तसेच देशातील अल्पसंख्यांक समुदायाची ही दीर्घकाळाची मागणी पूर्ण करण्यास सांगितले आहे. सध्या संपूर्ण खैबर पख्तूनख्वाह प्रांतात केवळ मर्दान, कोहात आणि तिसरा सिंधू नदीच्या काठी खैराबाद या येथे ३ ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था असून ती अत्यंत अपुरी पडते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *