-
‘सर्व धर्म समान’ या शब्दामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप
-
कुराणनुसार इस्लाम धर्मच सर्वांत महान असल्याने ‘सर्व धर्म समान’ म्हणणे इस्लामविरोधी असल्याचे तक्रारदाराचे मत !
- ‘सर्व धर्म समान नाहीत’, हे पाकमधील एखाद्या मुसलमान नेत्याने म्हणणे, हे आर्श्चयकारक नाही. भारतात केवळ हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे डोस मोहनदास गांधी यांचा राजकारणात उदय झाल्यापासून, म्हणजे गेल्या १०० वर्षांपासून पाजण्यात आल्याने देशात केवळ हिंदूच ‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणतात, तर अन्य पंथीय कधीच असे म्हणत नाहीत आणि त्यानुसार वागतही नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
- पाकमधील या तक्रारीविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडणार नाही; कारण त्यांच्या लेखीही ‘सर्व धर्म समान’, हे केवळ हिंदूंसाठीच आहे !
इस्लामाबाद : ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द उच्चारल्याच्या प्रकरणी पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष असलेल्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’चे नेते तथा माजी केंद्रीयमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विरोधात पंतप्रधान इम्रान खान यांच्या सत्ताधारी ‘तहरिक ए-इन्साफ’ या पक्षाचे नेते अधिवक्ता कमर रियाज यांनी पोलिसांत नुकतीच तक्रार प्रविष्ट केली.
‘सर्व धर्म समान’, असे म्हणणे इस्लामविरोधी ! – अधिवक्ता कमर रियाज
ख्वाजा आसिफ यांनी संसदेत भाषण करतांना ‘इस्लामसह सर्व धर्म समान असून कुठलाही धर्म लहान किंवा मोठा नसतो’, असे वक्तव्य केले होते. आसिफ यांचे हे वक्तव्य अधिवक्ता रियाज यांनी दूरचित्रवाहिनीवर ऐकले आणि त्यांनी त्यांनी आसिफ यांच्याविरुद्ध थेट पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. अधिवक्ता रियाज म्हणाले, ‘‘आसिफ यांच्या वरील वक्तव्यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कुराणनुसार इस्लाम धर्मच सर्वांत महान आहे. त्यामुळे ‘सर्व धर्म समान’, असे म्हणणे, हे इस्लामविरोधी आहे. हे शरिया कायद्यानुसारही चुकीचे आहे.’
कट्टरपंथियांनी पाकिस्तानची परंपराच नष्ट केली ! – ख्वाजा आसिफ
स्वतःविरुद्ध झालेल्या तक्रारीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘‘माझ्याविरुद्ध तक्रार करणारे तेच लोक आहेत, जे इस्लामाबाद येथे हिंदूंचे मंदिर बांधण्यास विरोध करत आहेत. हे तेच लोक आहेत, ज्यांनी पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांना ‘काफिरे आजम’ असे म्हटले होते. हे लोक त्यांचेच प्रतिनिधित्व करत आहेत, ज्यांच्यावर जिना सर्वाधिक विश्वास ठेवत होते. अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे रक्षण करणे, ही इस्लामी परंपरा आहे. (ख्वाजा आसिफ यांचा विनोद ! पाकमध्ये प्रतिदिन हिंदूंवर होणारे अत्याचार आसिफ यांना दिसत नाहीत का ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात) इस्लामी सत्तेत अल्पसंख्यांकांना कधीही असुरक्षित वाटले नाही. (जिहादी आतंकवादामुळे पाकमधील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापेक्षा मोठी असुरक्षितता कोणती असू शकते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वर्ष १९८० च्या काळातील कट्टरपंथियांनी पाकिस्तानची ही परंपराच नष्ट केली आहे. समाजात सहिष्णुता आणि बंधूभाव वाढवणे, हे नेत्यांचे दायित्व आहे.’’
‘पाकिस्तान मुस्लिम लीग’कडून आसिफ यांचे समर्थन
‘पाकिस्तान मुस्लिम लीग’चे अध्यक्ष अध्यक्ष शहबाज शरीफ यांनी ट्वीट करून आसिफ यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘‘इस्लाम हा महान धर्म आहे. इस्लामी राष्ट्रात रहाणार्या सर्व समुदायांचे हक्क आणि स्वातंत्र्य स्पष्ट आहेत. पाकिस्तानच्या घटनेमध्ये समानता हे मूलभूत तत्त्व अंतर्भूत आहे. ख्वाजा आसिफ यांनी संसदेत जे वक्तव्य केले, ते इस्लामी शिकवण आणि घटनात्मक तरतुदी यांच्या संदर्भात होते.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात