रक्षाबंधनाच्या दिवशी गायीचे चामडे आणि राखी यांचा संबंध जोडण्याचा ‘पेटा’चा अश्लाघ्य प्रयत्न
- चामड्यांच्या राख्या बनवल्या जात नाहीत. असे असतांना त्याचा वापर न करण्याविषयी जनतेला आवाहन करतांना रक्षाबंधनाचा आधार घेण्याची काय आवश्यकता ? हिंदूूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी ‘पेटा’ हेतूपुरस्सर प्रयत्न करत आहे, हे जाणा !
- ईदला ‘गोहत्या करू नका आणि चामडेमुक्त व्हा’ असे आवाहन करण्याचे धारिष्ट्य ‘पेटा’ दाखवेल का ? अशा कथित प्राणीप्रेमी संस्थेला आता हिंदूंनीच वैध मार्गाने तिची जागा दाखवणे आवश्यक !
नवी देहली : जगभरात प्राण्यांच्या रक्षणासाठी कार्य करणारी ‘पेटा’ (दी पीपल फॉर द अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) या संस्थेने प्राण्याच्या चामड्यांचा वापर करण्याच्या विरोधात मोहीम राबवली आहे. या अनुषंगाने या संस्थेकडून रक्षाबंधानाच्या निमित्ताने देशात काही ठिकाणी होर्डिंग लावले आहेत. त्यात एका बाजूला गाय आणि दुसर्या बाजूला राखी दाखवण्यात आली आहे. त्याच्या खाली लिहिले आहे की, ‘या रक्षाबंधनाच्या वेळी कृपया मला साहाय्य करा ! चामडेमुक्त बना !!’ : पेटा इंडिया.’ या होर्डिंगचा विरोध होऊ लागला आहे; कारण रक्षाबंधनासाठी चामड्याचा वापर केला जात नाही. तरीही अशा प्रकारचा संदेश देऊन पेटाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात