- गोहत्या करून भूमी अपवित्र करण्याची धर्मांधांची सिद्धता
- पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंची स्थिती किती दयनीय आहे, हे यावरून लक्षात येते ! याविषयी भारत सरकारने आता तरी आवाज उठवला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : येथे पाक सरकारच्या १० कोटी रुपयांच्या साहाय्यातून बनवण्यात येणारे पहिले हिंदु मंदिर तेथील कट्टर मुसलमान संघटनांच्या विरोधामुळे होण्याची शक्यता अल्प झाली आहे. त्यात येत्या बकरी ईदच्या दिवशी ज्या ठिकाणी मंदिर बांधण्यात येणार आहेत, तेथे गोहत्या करून ती जागा अपवित्र करण्याची आणि त्यातून हिंदूंना धमकावण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकमधील सामाजिक कार्यकर्ते असणारे मात्र सध्या दक्षिण कोरियामध्ये रहात असलेले अधिवक्ता राहत ऑस्टिन यांनी दिली.
१. इस्लामाबादमध्ये सध्या ३ सहस्र हिंदू रहातात. येथे केवळ २ मंदिरे आहेत; मात्र तीही मुसलमानांच्या कह्यात आहेत. तेथे हिंदू पुजा करू शकत नाहीत. त्यामुळे हिंदू इस्लामाबादमध्ये मंदिर बांधू इच्छित आहेत, तसेच ते येथील परिसरात अंत्यसंस्कारही करू शकतात. सध्या त्यांना शेकडो किलोमीटर लांब सिंध प्रांतात जावे लागते.
२. इस्लामाबादमधील मंदिर बांधण्यासाठी नवाज शरीफ सरकारने हिंदूंना भूमी दिली होती. ते सत्तेत असतांना मंदिर बांधले गेले नाही. त्यानंतर इम्रान खान सरकारने मंदिरासाठी १० कोटी रुपये दिले; मात्र पैसे मिळण्यास विलंब झाल्याने हिंदूंनीच १३ लाख रुपये गोळा करून मंदिराचे बांधकाम चालू केले. त्या वेळी मुसलमान संघटनांनी विरोध केला. त्यानंतर याचे काम थांबवावे लागले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात