चीनच्या नादी लागून आता नेपाळचे कम्युनिस्ट पंतप्रधान ओली हे ही आसुरी विस्तारवाद जोपासत असल्याचे दिसून येत आहे. भारत-नेपाळ यांच्यात वितुष्ट निर्माण करू पहाणार्या ओली यांना आता नेपाळी जनतेनेच घरचा रस्ता दाखवला पाहिजे !
पश्चिम चंपारण (बिहार) : नेपाळने बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात असलेल्या ‘सीतामाता गुहा’ नावाने ओळखल्या जाणार्या भागावर दावा सांगितला आहे. काही नेपाळी समाजकंटकांनी भारत-नेपाळ सीमेवर असणार्या सीतामाता गुहा भागात लावण्यात आलेला दगडी खांब क्रमांक ४३६ उखडून टाकला.
या घटनेची माहिती काही स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाला मिळाली. यानंतर सैन्यातील अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली. नेपाळी सरकारच्या म्हणण्यानुसार ‘सीतामाता या गुहेत काही दिवस राहिली होती आणि त्यानंतर येथूनच ती वाल्मीकि आश्रमात गेली होती.’ आतापर्यंत या ठिकाणी दोन्ही देशांतील नागरिक पूजा करत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात