#Censor_Web_Series हा हॅशटॅग प्रथम स्थानी !
सरकारकडे अशी मागणी का करावी लागते ? हिंदु धर्म, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना अवमानित करणार्या अशा वेब सिरीजवर सरकार स्वतःहून बंदी का घालत नाही ?
मुंबई : हिंदुविरोधी, तसेच अश्लील वेब सिरीजचे वाढते प्रमाण पहाता १९ जुलै या दिवशी ट्विटरवर #Censor_Web_Series हा ‘हॅशटॅग’ (ट्विटरवर एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड झाला. दुपारी चालू झालेला हा ट्रेंड काही वेळातच पहिल्या स्थानी होता. या ट्रेंडमध्ये सायंकाळपर्यंत ७५ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या. या वेळी वेब सिरीजला परीनिरीक्षण मंडळाच्या नियंत्रण कक्षेत आणण्याची धर्मप्रेमी हिंदूंनी मागणी केली.
१. गेल्या काही वर्षांपासून ‘अॅमेझॉन प्राईम’, ‘नेटफ्लिक्स’, ‘अल्ट बालाजी’, ‘झी ५’ यांसारख्या ऑनलाईन माध्यमांतून नवनवीन वेब सिरीज प्रसारित होण्याचे प्रमाण वाढले आहे. या वेब सिरीज प्रमाणित किंवा परीनिरीक्षण मंडळाकडून प्रमाणित केल्याविना प्रसारित केल्या जातात. त्यांचे ‘सेन्सॉर’ न केल्याने यामध्ये अश्लीलता, शिव्यांचा उपयोग, व्यसनाधीनता आणि भरपूर प्रमाणात हिंसा दाखवण्यात येते.
२. नुकत्याच ‘नेटफ्लिक्स’वर प्रसारित झालेल्या ‘कृष्णा अॅन्ड हिज लिला’, तसेच यापूर्वी ‘पाताल लोक’, ‘सॅक्रेड गेम्स’, ‘लैला’ यांसारख्या वेब सिरीजमध्ये हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता तथा हिंदु परंपरा यांचा अवमान करण्यात आला आहे. तसेच ‘कोड एम्’, ‘कोर्ट मार्शल’ यांसारख्या वेब सिरीजमध्ये तर भारतीय सेनेलाच चुकीच्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
३. या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी प्रसारण मंत्रालयाला वेब सिरीजसाठी स्वतंत्र परीनिरीक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी केली. तसेच सेन्सॉर केल्याविना कोणतीच वेब सिरीज प्रसारित होऊ नये, अशीही मागणी केली.
धर्मप्रेमींच्या काही ट्वीट्स
नुकतेच महाराष्ट्राच्या गृहखात्याने मुसलमानांच्या धर्मभावना लक्षात घेऊन केंद्र सरकारला ‘महंमद : मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली; पण दुर्दैवाने हिंदु धर्माच्या होणार्या अवमानाविषयी कुणीही अशी मागणी करत नाही. असा दुटप्पीपणा का ?, असा प्रश्न एका धर्मप्रेमीने केला.
अशा वेब सिरीजमुळे भारतीय संस्कृतीचे अध:पतन होत आहे. नैतिकता र्हास पावत आहे. तसेच भावी पिढीवर चुकीचे संस्कार होत आहेत. त्यामुळे वेब सिरीजवर त्वरित नियंत्रण आणण्यात यावे, असे अन्य एका धर्मप्रेमीने ट्वीट केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात