- शरद पवार यांचे विधान म्हणजे श्रीरामरूपी अवताराच्या सामर्थ्याची जाण नसल्याचे द्योतक !
- पवार यांना काय वाटते याहून अधिक भाविक-भक्तांना काय वाटते, याचा विचार केला असता तर पवार यांची समाजाभिमुखता दिसून आली असती, असे सामान्य जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९ जुलै या दिवशी सोलापूर दौर्यावर असतांना घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, ‘कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे, याविषयी आम्ही विचार करत आहोत. काही लोकांना वाटत असेल की, मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा; मात्र ‘कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांना साहाय्य करण्यास प्राधान्य द्यायला हवे’, असे आम्हाला वाटते.’ उत्तरप्रदेश येथील अयोध्येमध्ये ५ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमीपूजन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले की, दळणवळण बंदीमुळे लोकांची आर्थिक हानी होत आहे. त्याकडे राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवे. आमचे सहकारी खासदार आहेत, ते देहली येथे जाऊन प्रश्न मांडतील.
(हिंदु धर्मातील देवता आणि मंदिरांचे महत्त्व नसणार्यांकडून असेच बोलले जाणार. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीमुळे समाज धर्मापासून पर्यायाने नैतिक मूल्यांपासून दूर गेला आहे. त्याचा परिणाम म्हणून देशातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार यांनी थैमान घातले आहे. ही हानी भरून काढण्यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात