स्वरक्षण प्रशिक्षण शिकून सक्षम होण्याचा सहभागी धर्मप्रेमी महिलांचा निर्धार !
पुणे : येथे धर्मप्रेमी महिलांसाठी १ आठवडाभर घेण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ शौर्यवर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेवटच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सांगता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वर्गात हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके शिकवली. यासह स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्वही वर्गात सांगण्यात आले. १९ धर्मप्रेमी महिला सांगता बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी नियमितपणे २ स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.
वैशिष्ट्यपूर्ण
१. या वर्गात सहभागी झालेल्या एका महिलेने त्यांना सामोरे जावे लागलेल्या अत्याचाराच्या प्रसंगाला त्यांनी कसे तोंड दिले ? याचे प्रत्यक्ष उदाहरण सांगून स्वरक्षण प्रशिक्षण घेण्यासाठी सर्व महिलांना उद्युक्त केले.
२. आठवड्यातून २ दिवस प्रशिक्षणवर्ग घेण्याविषयी विचारल्यावर सर्वांनी ‘प्रतिदिन घेऊया, आम्हाला लवकर शिकायचे आहे’, असे सांगितले.
३. ‘शनिवारी आणि रविवारी साधना शिबिर घेऊया का ?’, असे विचारल्यावर उपस्थितांनी ‘प्रतिदिन घेऊया म्हणजे आमचे नियमित प्रयत्न होतील’, असे सांगितले.
४. एका महिलेने प्रशिक्षणवर्ग चालू झाल्यावर त्यांच्या संपर्कातील अन्य महिलांना विषय सांगितला आणि त्यांना संबंधित जिल्ह्यातील वर्गाला जोडून दिले.
सहभागी धर्मप्रेमी महिलांच्या प्रतिक्रिया
१. निकिता रोकडे – ‘शक्तीस्तवन’ म्हणतांना आदिशक्ती समोर उभी असल्याचे जाणवते. (हे सांगतांना त्यांची पुष्कळ भावजागृती होत होती.) माझी २ मुले पुष्कळ दंगा करायची; पण या वर्गाला जोडल्यामुळे ती आता शांत झाली आहेत. तसेच वर्गाला जोडल्याने आनंदही मिळू लागला आहे.
२. सपना कटकधोंड – या वर्गातून चैतन्य मिळते, उत्साह टिकून रहातो. दिवसभरात काम करतांना थकल्यासारखे होत नाही.
३. चारुशीला चिंचकर, धनकवडी – स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामुळे आत्मविश्वास वाढला. त्यामुळे मुलांनी लावलेल्या ‘मास्क’वर ‘जगदंब’ असे लिहिलेले होते. त्याविषयी मुलांचे प्रबोधन केले.
४. प्रीती ठाकरे – प्रशिक्षणवर्गात आल्यापासून नामजपाची ओढ लागली आहे. ‘नामजप करावा’, असे वाटू लागले आहे.
५. ज्योती घाडी (वय वर्षे ५३) – आरंभी वर्गाला जोडता येणार नाही, मला जमणार नाही, माझे गुडघे दुखतात, असे वाटायचे; पण भगवंत करून घेत असल्यामुळे माझे गुडघे आता दुखत नाहीत.
६. दीपाली जाधव – वर्गामुळे घरामध्ये होणारी चिडचिड न्यून झाली आहे.
७. प्राजक्ता, बेंगळुरू – या वर्गामध्ये आपलेपणा आणि प्रसन्नता जाणवते.