छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने तेथे ख्रिस्ती मिशनर्यांना मोकळे रान मिळाले असून त्यातून अशा घटना घडत आहेत. अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
सरगुजा (छत्तीसगड) : येथील एका चर्चच्या मागे धर्मांतरित ख्रिस्ती माकुस किंडो याने एका दुभत्या गायीला अमानुष मारहाण केली आणि नंतर तिला फाशी देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली. याविषयी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यावर किंडो याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे येथील हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी भाजपकडून पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन कारवाईची मागणी करण्यात आली. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मिशनरी कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी येथे एक शिवलिंगाची तोडफोड करण्यात आली होती; मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात