जय श्रीराम च्या जयघोषाने सांगोल्यात (जिल्हा सोलापूर) हिंदुत्वाचा आविष्कार !
सांगोला (जिल्हा सोलापूर) : जय श्रीराम !, आर्य सनातन वैदिक धर्माचा विजय असो ! , यांसारख्या जयघोषांत सांगोल्यात हिंदुत्वाचा आविष्कार घडला. श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके आणि प्रा. विलास वांगीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ झालेली पदफेरी शहरातील प्रमुख मार्गावरून येऊन पुन्हा श्रीराम मंदिर येथे पदफेरीची सांगता झाली.
भगवी टोपी, झेंडे, क्षात्रतेज जागृत करणार्या घोषणांनी सांगोलकरांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे पदफेरी चालू असतांना वाटेत येणार्या प्रत्येक देवळावर श्री. प्रभु पतंगे आणि श्री. आकाश घोंगडे या धर्माभिमान्यांनी भगवा ध्वज लावला. प्रथमच काढण्यात आलेल्या पदफेरीतील धर्माभिमानी हिंदूंचा उत्साह प्रचंड होता. दुपारी १२ वाजता श्रीराम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता शहरातून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पदफेरीमध्ये सर्वश्री सुनील बीडकर, अभियंता संतोष भोसले, अभियंता राहुल सोनलकर, अधिवक्ते सचिन पाटकुलकर, मयुरेश गुरव, राहुल देवकर, अजिंक्य झपके, योगेश स्वामी, रवि चौगुले, आनंद मारडे, संतोष महामुनी, प्रभु पतंगे, सुशील अंकलगी, नीलेश खडतरे, संजोग घोंगडे, रणजित स्वामी, विशाल स्वामी, अक्षय स्वामी, शंभू झपके, बंटी बिनवडे, आकाश घोंगडे, हरि पतंगे, तानाजी गोडसे, आनंद भंडारे, संतोष पाटणे यांसह शेकडो धर्माभिमानी हिंदू या पदफेरीत सहभागी झाले होते. पोलिसांनीही पदफेरीला साहाय्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात