‘पीके’सारखे चित्रपट, ‘पाताललोक’सारख्या वेबसीरिज या माध्यमांतून हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्र आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता, परंपरा यांची खिल्ली उडवली जाते. हिंदु समाज याविषयी आवाज उठवत नसल्याने ‘बॉलीवूड’मध्ये हिंदुद्रोहाला खतपाणी घातले जात आहे. ब्राह्मण व्यक्तीला कपटी किंवा बलात्कारी दाखवणे, भारतामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे दाखवणे, हे सर्व म्हणजे समाजाचा ‘ब्रेनवॉश’ केला जात आहे. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाला अपकीर्त करणारी बॉलीवूडची मंडळी आतंकवाद्यांच्या विशिष्ट घोषणांविषयी का बोलत नाहीत ? ‘तिहेरी तलाक’विषयी का बोलले जात नाही ?, असा परखड प्रश्न करत हे हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच असल्याचे प्रतिपादन हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पायल रोहतगी यांनी समस्त बॉलीवूडकरांना विचारला. त्या 19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का पर्दाफाश’ या विषयावरील ‘विशेष संवादा’त बोलत होत्या.
संवादाच्या आरंभी चित्रपट, मालिका, ‘वेबसीरिज’ या माध्यमांतून पद्धतशीरपणे हिंदु धर्म आणि समाज यांची कशाप्रकारे अपकीर्ती करण्यात येते, हे सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली. हा ऑनलाईन संवाद यू-ट्यूब आणि फेसबूक या माध्यमांतून 3,89,760 लोकांपर्यंत पोहोचला, तर 1,08,411 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला. या विषयावर अनेकांनी ट्विटरवर #Censor_Web_Series हा हॅशटॅग वापरून समर्थन केले. काही वेळातच हा हॅशटॅग भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेडींगमध्ये होता. या विषयाबाबत तब्बल 1 लाखाहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.
या संवादात सहभागी झालेले सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता सुभाष झा म्हणाले की, ‘बॉलीवूड’ हा जिहादींचा अड्डा बनला असून येथे ‘लव्ह जिहाद’ला खतपाणी घातले जाते. भारताचे इस्लामीकरण करण्याच्या षड्यंत्रात बॉलीवूडचा मोठा हात आहे. हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम यांसारख्या ‘अंडरवर्ल्ड’च्या गुंडांनी ‘बॉलीवूड’ला निधी देऊन सुनियोजितपणे ‘खानां’ना स्थापित केले आहे. बॉलीवूडच्या या जिहादी अंगाची ‘एन्आयए’कडून चौकशी व्हायला हवी.
चित्रपट आणि सामाजिक प्रसारमाध्यमे यांतील हिंदुहनन रोखणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश सोलंकी म्हणाले की, ‘बॉलीवूड’ हे ‘डी गँग’चा पैसा पांढरा करण्याचे माध्यम आहे. निखळ किंवा मनोरंजनासाठी हास्यविनोद न करता हिंदु धर्म आणि परंपरा यांवर अश्लाघ्य विनोद केले जातात. या विरोधात हिंदूंनी संघटित लढा दिला पाहिजे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, ज्या रझा अकादमीने मुंबईत वर्ष 2012 मध्ये दंगल घडवली होती, तिच्या मागणीवरून ‘महंमद : द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदीसाठी महाराष्ट्र सरकारने लगेच शिफारस केली; मात्र हिंदु धर्मावर आघात करणार्या चित्रपटांना हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी शासनाकडून मात्र काही कारवाई होत नाही. कायद्याचे बंधन नसल्याने ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म्सवरून अत्यंत आक्षेपार्ह, हिंदुविरोधी, देशविरोधी व सैन्यविरोधी ‘वेबसीरिज’ प्रसारित होत आहेत. ‘कोर्ट मार्शल’, ‘कोड एम्’ या वेबसीरिजमध्ये तर भारतीय सैन्य समलैंगिक असल्याचे दाखवले आहे. सरकारने अशा ‘वेबसीरिज’ व ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’ केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या नियंत्रणाखाली आणायला हवेत.
‘हिंदुविरोधी बॉलिवूडचा पर्दाफाश’ या ऑनलाईन विशेष संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद
८२ सहस्र ७५९ जणांनी हा विशेष संवाद पाहिला, तर ‘फेसबूक’द्वारे ३ लाख १७ सहस्र १८४ लोकांपर्यंत हा विषय पोचला (रिच मिळाले), तर ट्विटरद्वारे १ लाख ३ सहस्रांहून अधिक ट्वीट करण्यात आल्या.