‘जनम टीव्ही’कडून राष्ट्रवादी विचार प्रसारित करण्यात येत असल्याने धमकी
- ‘आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूसह अन्य धर्मियांना लक्ष्य करतात’, हे लक्षात घ्या !
- केरळमध्ये साम्यवादी सरकार असल्याने ‘जनम टीव्ही’च्या कर्मचार्यांचे कितपत संरक्षण होईल, याविषयी शंकाच येते. त्यामुळे केंद्र सरकारने यात लक्ष घालून या टीव्हीच्या कर्मचार्यांच्या सुरक्षेकडे पहावे, असे हिंदूंना वाटते !
कोची (केरळ) : इस्लामिक स्टेटने केरळमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या ‘जनम टीव्ही’ या वाहिनीच्या सर्व कर्मचार्यांना ‘इस्लाममध्ये धर्मांतर करा अथवा मरण्यास सिद्ध व्हा’ अशी धमकी दिली आहे. इस्लामिक स्टेटच्या केरळ शाखेने ‘इन्स्टाग्राम’वरून ही धमकी दिली आहे. (केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’सारखी आतंकवादी संघटना कशी काय कार्यरत रहाते ? साम्यवाद्यांच्या राज्यात एक आतंकवादी संघटना ‘इन्स्टाग्राम खाते चालवते, हे लक्षात घ्या ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात ) आतंकवादी संघटनेने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस महासंचालक लोकनाथ बेहरा यांनी ‘जनम टीव्ही’च्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्याचा आदेश दिला आहे.
‘जनम टीव्ही’ प्रेक्षक संख्येत मोठी वाढ झाली आहे आणि आता राज्यातील महत्त्वाच्या ५ मल्ल्याळम् वृत्तवाहिन्यांमध्ये स्थान निर्माण झाले आहे. ही वाहिनी केरळमध्ये राष्ट्रवादी दृष्टीकोनातून बातम्या आणि माहिती प्रसारित करते. इतर वाहिन्यांवर साम्यवादी विचारांचे वर्चस्व आहे. (यातून लक्षात येते की, इस्लामिक स्टेटचा साम्यवादी विचारांना कोणताही विरोध नाही; कारण ते भारतीय राष्ट्रवादाचा विचार करत नाहीत आणि त्याचा प्रसारही करत नाहीत; मात्र जनम टीव्ही तो करत असल्याने तिच्या कर्मचार्यांना ठार मारण्याची धमकी दिली जाते ! या धमकीमागे साम्यवादी विचारसरणीचे लोकही आहेत का, याचाही शोध घ्यायला हवा ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात