आयशा हिला बांगलादेशात अटक
हिंदूंना धर्मशिक्षण न मिळाल्याने त्यांचे कुणीही धर्मांतर करून त्यांना आतंकवादी किंवा धर्मांतराच्या कामामध्ये ढकलले जाते, हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे !
ढाका (बांगलादेश) : ढाका पोलिसांच्या ‘काऊंटर टेररिझम अँड ट्रांसनॅशनल क्राईम’च्या (सीटीटीसीच्या) शाखेने येथे २५ वर्षीय आयशा (पूर्वश्रमीची प्रज्ञा) नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश’ची (जे.एम्.बी.ची) सदस्य आहे.
पोलिसांच्या चौकशीत उघड झाले की,
१. आयशा हिंदु धर्मीय होती आणि ९ वीमध्ये शिकत असतांना तिचे धर्मांतर करण्यात आले होते. तिचे मूळ नाव प्रज्ञा देबनाथ होते. ती कोलकाताच्या धनियाकाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या केशाबपूर गावात रहाणारी होती. तिची चांगली मैत्रिण एक मुसलमान मुलगी होती. तिच्या प्रभावामध्ये असतांना वर्ष २००९ मध्ये तिचे विश्वासघात करून धर्मांतर करण्यात आले. (हिंदु मुलींनी कुणाशी मैत्री केली पाहिजे आणि कुणाशी नाही, हे यातून लक्षात येते ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
२. त्यानंतर तिचे नाव ‘आयशा जन्नत मोहोना’ ठेवण्यात आले. नंतर तिला सलाफी शाखेच्या (इस्लाममधील सुन्नी मुसलमानांची एका शाखा. ही अत्यंत कट्टरतावादी शाखा म्हणून ओळखली जाते.) मौलवीकडून कट्टरतेचे शिक्षण देण्यात आले. यानंतर ती ‘जे.एम्.बी.’च्या महिला शाखेच्या संपर्कात आली आणि तिला या संघटनेचे सदस्य बनवण्यात आले. यासाठी या शाखेची प्रमुख असमानी खातून (बोंदी जिबोन) हिने प्रमुख भूमिका निभावली.
३. यानंतर तिला हिंदु मुलींना आमीष दाखवून धर्मांतर करण्याचे काम देण्यात आले. (हिंदूंचे धर्मांतर करून त्यांच्याच माध्यमातून हिंदूंना बाटवण्याचे काम ख्रिस्ती मिशनरी आणि धर्मांध करतात, हे लक्षात घ्या ! स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते की, ‘एका हिंदूंचे धर्मांतर झाले, तर एक हिंदू अल्प झाला’, असे नाही, तर ‘एका शत्रूमध्ये वाढ झाली’, असे आहे.’ – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
४. या अंतर्गत ती हिंदु मुलींची ओळख सलाफी मौलवींशी करून देत होती. त्यानंतर मौलवी या मुलींचे ‘ब्रेन वॉश’ करून त्यांना संघटनेत सहभागी करून घेत होते.
५. आयशाने नुकतेच आमीर हुसैन सद्दाम नावाच्या बांगलादेशी मुसलमानाशी दूरभाषवरूनच लग्न केले होते. आमीर सध्या ओमानमध्ये रहात आहे. त्याच्या सांगण्यावरूनच ती बांगलादेशात रहाण्यास गेली. तेथील मदरशांमध्ये ती शिक्षक म्हणून काम करत होती.
६. जे जिहादी बनू शकतात, अशा मुसलमान तरुणांना शोधणे, हे तिचे बांगलादेशातील मुख्य काम होते. ती सामाजिक माध्यमांतूनही हे काम करत होती. याद्वारे तिने अनेक युवकांना जे.एम्.बी.चे सदस्य बनवले होते, तसेच अनेक बंगाली तरुणांना बांगलादेशात आणले होते. अटक केल्यानंतर ही जरही डगमगली नव्हती. (बाटगे अधिक कट्टर असतात, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु असतांना हिंदू घाबरट असतात, तर धर्मांतर केल्यावर ते उद्याम होतात ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
जे.एम्.बी.चे गड असलेले बंगालमधील मदरसे आणि मशिदी !
आधी साम्यवादी आणि आता तृणमूल काँग्रेस यांच्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या राज्यात बंगाल हा जिहादी आतंकवाद्यांचा गड बनला आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेऊन देशाचे रक्षण केले पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
बंगालमध्ये सलाफी मौलवींचे अनेक मदरसे आणि मशिदी आहेत. त्यांना आखाती देशांतून पैसे येतात आणि याद्वारे ते धर्मांतरासह आतंकवादी कारवाया करतात. जे.एम्.बी.च्या आतंकवाद्यांना येथे आश्रय दिला जातो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात