सातत्याने होणार्या जिहादी आतंकवाद्यांच्या आक्रमणामुळे निर्णय
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे पूर्वी भारतातेच भाग होते आणि तेथे हिंदू मोठ्या संख्येने होते; मात्र धर्मांधांमुळे तेथे हिंदूंचा वंशसंहार होत आहे. अशा वेळी हिंदूंना भारतात आश्रय देण्यासह हिंदूंवर अत्याचार करणार्या तेथील आतंकवाद्यांनाही भारताने धडा शिकवणे अपेक्षित आहे !
नवी देहली : अफगाणिस्तानमध्ये शीख आणि हिंदू यांच्यावर होणार्या धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांच्या आक्रमणांमुळे येथील ७०० शीख आणि हिंदू यांना भारत सरकार भारतात आणून त्यांना आश्रय देणार आहे. यासाठी लवकरच देहलीत आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अफणिस्तानमधील शिखांचे नेते निदानसिंह सचदेव यांची सुटका
येथील अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांचे नेते निदानसिंह सचदेव यांची सुटका करण्यात आली आहे. २२ जून या दिवशी त्यांचे तालिबानी आतंकवाद्यांनी अपहरण केले होते. निदानसिंह हे वर्ष १९९२ पासून त्यांच्या परिवारासह देहलीत रहात होते. ३ मासांपूर्वीच ते अफगाणिस्तानमध्ये गेले होते, तेव्हा त्यांचे अपहरण करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात