घरात माओ आणि शी जिनपिंग यांची छायाचित्रे लावण्याचा आदेश
भारतात असे काही घडले असते, तर एव्हाना संपूर्ण देश डोक्यावर घेण्यात आला असता; मात्र चीनमध्ये मुसलमान आणि आता ख्रिस्ती यांच्यावर अत्याचार होत असतांना कुणीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !
बीजिंग (चीन) : चीनच्या फुजियान प्रांतामध्ये चीनच्या सरकारकडून अनेक चर्च पाडण्यात आले आहेत, असा दावा केला जात आहे, तसेच ख्रिस्त्यांना त्यांच्या घरांतील येशूचे चित्र आणि क्रॉस काढून टाकून त्याजागी माओ आणि चीनचे विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांची छायाचित्रे लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. चीनमध्ये उघुर मुसलमानांनंतर आता ख्रिस्त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. ‘रेडिओ फ्रि एशिया’ या संकेतस्थळच्या एका अहवालामध्ये याविषयीची माहिती देण्यात आली आहे. सध्या चीनमध्ये ७ कोटी ख्रिस्ती रहातात.
१. काही दिवसांपूर्वीच चीनच्या अन्शुई, जियांग्सु, हेबई आणि झेजियांग या ४ राज्यांमध्ये चर्चाच्या बाहेर लावण्यात आलेली ख्रिस्ती धार्मिक चिन्हे काढून टाकण्यात आली होती.
२. चीनच्या हुआनान प्रांतामध्ये १८ आणि १९ जुलै या दिवशी सरकारी कर्मचारी येथील विन ख्राईस्ट चर्चवरील क्रॉस काढण्यासाठी गेले असता ख्रिस्त्यांनी त्यांना विरोध केला. यामुळे २ दिवस येथे तणाव होता; मात्र नंतर हे क्रॉस पाडण्यात आले. त्यापूर्वी झेजियांग येथेही अशा प्रकारे क्रॉस पाडण्यात आले.
३. गेल्या वर्षी चीन सरकारने एका आदेशाद्वारे ‘धार्मिक ग्रंथांचे भाषांतर करता येणार नाही’, असे सांगितले होते. या आदेशाचे पालन न करणार्यांना शिक्षा करण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात