- कोरोना कक्षातील सकारात्मक पालट लक्षात घेता, साधनेचे महत्त्व अधोरेखित होते. शासनाने हे लक्षात घेऊन सर्वत्रच्या कोरोना कक्षात टप्प्याटप्प्याने साधना शिकवण्यावर भर दिला पाहिजे !
- यावरून परमेश्वराच्या भक्तीचे सामर्थ्य लक्षात येते. संकटकाळात अनेक श्रद्धाळू भाविक परमेश्वराच्या दर्शनाची वाट पहात आहे. शासनाने आता मंदिरे उघडण्यास अनुमती दिली पाहिजे ! ‘देवाच्या कृपेने कोरोना नष्ट होण्यासाठी नक्की साहाय्य होईल’, अशी भाविकांची श्रद्धा आहे’, याची शासनाने नोंद घ्यायला हवी !
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. बाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. रुग्णांनी भजन-कीर्तनामुळे कोरोनाचा विसर पडला असल्याचे सांगितले.
सत्संग, भजन, कीर्तन यांसारख्या आध्यात्मिक गोष्टींमुळे रुग्णांच्या मनातील भीती जाऊन ते चिंतामुक्त होतात. गांधीनगर येथील व्यापारी या कक्षामध्ये असून ते केवळ भ्रमणभाषवर वेळ घालवत आणि अन्य वेळेस चिंताग्रस्त चेहरा करून बसून रहात. यावर उपाय म्हणून यातील काही रुग्णांनी भजन, कीर्तन चालू केल्यापासून येथील सर्वांच्या चेहर्यावरील तणाव न्यून झाला आहे. सर्वजण आपापल्या खाटेजवळ उभे राहून सायंकाळी १ घंटा भजन, कीर्तन करतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात