Menu Close

राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी खैरात वाटणारे शासन वेदपाठशाळांना अनुदान देणार का ?

मुंबई : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत राज्यातील १२१ मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी वर्ष २०२०-२१ करता राज्यशासनाकडून १० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे वर्ष २०१९-२० साठी मदरशातील शिक्षकांच्या मानधनासाठी यातील १ कोटी ८० लाख ६० सहस्र रुपये दिले जाणार आहेत.

मदरशांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धार्मिक शिक्षणासह अन्य शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश देणे, तसेच शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून रोजगार क्षमता वाढवणे, मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयांसाठी अनुदान, शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान यांसाठी निधीचा उपयोग केला जाणार आहे. यामध्ये कोकण, अमरावती, संभाजीनगर आणि नागपूर विभागातील मदरशांना अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *