Menu Close

सुलतानपूर : एका २२ वर्षीय साधूचा मृतदेह मंदिराच्या परिसरातील झाडावर लटकलेला आढळला

स्थानिकांनी व्यक्त केला हत्येचा संशय

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यस्थेचे तीनतेरा ! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) : येथील छतौना बाजाराजवळील वीर बाबा मंदिराच्या परिसरात एका बालयोगी साधूंचा मृतदेह एका झाडावर लटकलेला आढळून आला. बालयोगी सत्येंद्र आनंद सरस्वतीजी महाराज (वय २२ वर्षे) असे त्यांचे नाव आहे.

हे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या बालयोगी साधूंचे शव कह्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या साधूंची हत्या झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. ही हत्या आहे कि आत्महत्या ?, याचा शोध पोलीस घेत आहेत. बालयोगी सत्येंद्र आनंद सरस्वती महाराज हे हिमाचलप्रदेश येथून आले होते. अनेक वर्षांपासून ते छतौना बाजाराजवळील वीर बाबा मंदिरात वास्तव्यास होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *