प्रयागराज : अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘शंका निराधार आहेत’, असे सांगत फेटाळून लावली. देहलीतील पत्रकार साकेत गोखले यांनी मुख्य न्यायाधिशांकडे एका पत्राद्वारे ही याचिका प्रविष्ट केली होती.
( सौजन्य: Times Now )
यात गोखले यांनी म्हटले होते की, ‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जर बकरी ईदला सामूहिक नमाजपठण करण्याची अनुमती दिली गेली नाही, तर मग राममंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला ती कशी दिली जाऊ शकते ? भूमीपूजनाचा हा कार्यक्रम कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारा आहे. या कार्यक्रमाला अनुमाने ३०० जण एकत्र येणार असून त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला छेद दिला जाणार आहे. (रमझानच्या काळात सहस्रोंच्या संख्येने लोक सायंकाळी रोजा सोडण्यासाठी नियमभंग करून रस्त्यावर येत होते, तेव्हा साकेत गोखले झोपले होते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कार्यक्रमामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. (तबलिगी जमातमुळे देशात कोरोनाचा ३० टक्के फैलाव झाला, याविषयी साकेत गोखले यांनी तोंड उघडले होते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
साकेत गोखले यांचे राहुल गांधी यांच्याशी निकटचे संबंध ?
‘झी न्यूज’ने प्रकाशित केलेल्या वृत्तात साकेत गोखले यांचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी निकटचे संबंध आहेत. साकेत गोखले आणि राहुल यांची एकत्रित छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध झाली आहेत. ते काँग्रेस समर्थक असल्याचीही चर्चा आहे. (राममंदिराच्या विरोधात असणार्या काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही शहाणपण आलेले नाही; म्हणजे ही तिची ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे, असेच म्हणायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गांधी-नेहरू परिवाराचा राममंदिराचा विरोध अयशस्वी ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि
पुणे : गांधी-नेहरू परिवाराने हिंदुत्वाला, राममंदिराला विरोध करण्याचे त्यांचे व्रत पाळले; परंतु ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्याने ते यात अयशस्वी झाले. त्यामुळे कोणताही प्रतिबंध नसल्याने भूमीपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आपण कार्यारंभ करायचा आहे, अशी प्रतिक्रिया श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टमधील विश्वस्त प.पू. स्वामी गोविंद देवगिरि यांनी भूमीपूजनाच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्यावर व्यक्त केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात