राख्यांचा संबंध गायीच्या चामड्याशी जोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केल्याचे प्रकरण
हिंदूंनी केलेल्या संघटित विरोधाचाच हा परिणाम होय !
नवी देहली : राख्यांचा संबंध गायीच्या चामड्याशी जोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करत ‘चामडेमुक्त रक्षाबंधन साजरा करा’ असे अभियान राबणार्या ‘पेटा’ (पीपल ऑफ द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल) या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने हिंदूंच्या विरोधानंतर या संदर्भातील लेख तिच्या संकेतस्थळावरून काढून टाकला आहे. ‘या गैरसमजाविषयी क्षमा मागत आहोत’, असेही तिने म्हटले आहे. ‘राख्यांमध्ये गायीच्या चामड्यांचा वापर केला जातो’, असे सांगत ‘पेटा’ने हे अभियान राबवणे चालू केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात