Menu Close

धनबाद (झारखंड) येथे शिवमंदिरात जाणार्‍या हिंदु महिलेची धर्मांधांकडून छेड काढून मारहाण

८ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे राज्य असल्याने धर्मांधांचे फावले आहे आणि ते अशा प्रकारचे कृत्य करू धजावत आहेत ! हिंदूंकडून चुकून अन्य धर्मीय महिलेची छेड काढून तिला मारहाण झाली असती, तर संपूर्ण देशात ही मुख्य बातमी ठरली असती आणि पुरो(अधो)गाम्यांनी हिंदूंना असहिष्णु ठरवले असते ! आता मात्र या घटनेविषयी कुणीही बोलत नाही !

धनबाद (झारखंड) : येथील जियलगोरा भागामध्ये काही दिवसांपूर्वी शिवमंदिरात जाणार्‍या एका हिंदु महिलेची धर्मांधांकडून छेड काढली जात होती. या महिलेने त्यांना विरोध केल्यावर त्यांनी तिला मारहाण करण्यात आली. यात ती घायाळ होऊन तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला.

या प्रकरणी पोलिसांनी सद्दाम अंसारी, रियाज, नसरुद्दीन, मिटू अंसारी, शहादत, शाहिल, कैफ, शहबत आणि मोइनुद्दीन यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून एकाला अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *