- बकरी ईदला पशूंची हत्या करणे वैज्ञानिक आहे का ? ‘बकरी ईदला ‘कुर्बानी’ न देता त्या दिवशी शाकाहार करा’, असा मुसलमानांना सल्ला देण्याचे धारिष्ट्य काँग्रेसवाल्यांमध्ये आहे का ? निव्वळ हिंदू सहिष्णु आहेत म्हणून त्यांना असे फुकाचे सल्ले देणार्या काँग्रेसवाल्यांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करावा !
- काँग्रेसवाल्यांनी सत्तेत असतांना गरिबी हटवण्यासाठी काय प्रयत्न केले ? ‘काँग्रेसच्या जनताद्रोही कारभारामुळेच भारतात अजूनही गरिबी अस्त्विात आहे’, असे म्हटल्यास चूक ते काय ?
- ज्या गोष्टी हिंदु धर्माने सहस्रो वर्षांपूर्वीच सांगितल्या आहेत, त्यातील कणमात्रच गोष्टी आता कुठे विज्ञानाला कळू लागल्या आहेत. हिंदूंच्या सणांमागील विज्ञान कळण्यासाठी हिंदु धर्मानुसार साधना करणे आवश्यक आहे. राजकारण्यांना आणि त्यातही काँग्रेसच्या नेत्यांना हिंदु धर्माविषयी द्वेष असल्याने ते अशा प्रकारची विधाने करत रहातात !
बेंगळुरू (कर्नाटक) : नागपंचमीला हिंदूंनी नागदेवतेला दूध देणे अवैज्ञानिक आहे. याऐवजी हे दूध गरीब मुलांना, रुग्णांना द्या. कर्नाटकात प्रतिवर्षी ४० सहस्रांहून अधिक मुले कुपोषणामुळे मृत पावतात; म्हणून अशांना दूध द्या, असे फुकाचे आवाहन कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. याविषयीची ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. याला धर्मप्रेमींकडून विरोधही होत आहे.
दुधातील भेसळ आणि रस्त्यावर फेकण्यात येणार्या दुधाविषयी पुरो(अधो)गामी गप्पा का बसतात ? – हिंदु जनजागृती समिती
ज्या वेळी दूध उत्पादक आणि आंदोलक दुधाच्या दरात वाढ करावी; म्हणून आंदोलन करतांना लाखो लिटर दूध रस्त्यावर फेकतात, तेव्हा असे आवाहन करणारे गप्प का असतात ? भेसळखोर ८० टक्के दुधात भेसळ करून लाखो मुलांचे आरोग्य धोक्यात घालतात, त्यावर ते का बोलत नाहीत ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून सतीश जारकीहोळी यांना विचारला आहे.
या पत्रकात समितीने पुढे म्हटले की,
१. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
२. कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत असलेल्या गरीब मुलांना दूध मिळत नाही ही समस्या नसून सरकारने त्यांना योग्य त्या सुविधा न दिल्याने ही समस्या उद्भवली आहे. यावर केवळ वरवरचे उपाय म्हणून नागपंचमी वा महाशिवरात्री या एका दिवशी कुपोषितांना दूध देऊन ही समस्या संपणार आहे का ?
३. समस्त हिंदूंनी अशा आवाहनांना वैध मार्गाने विरोध केला पाहिजे, तसेच जारकीहोळी यांनी क्षमा मागावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात