जी माहिती संयुक्त राष्ट्रांना मिळते ती माहिती भारतीय गुप्तचरांना का मिळत नाही ? आता या माहितीच्या आधारे या जिहादी आतंकवाद्यांना शोधून त्यांनी आतंकवादी आक्रमण करण्यापूर्वीच त्यांना पकडले पाहिजे !
न्यूयॉर्क (अमेरिका) : कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे अनेक आतंकवादी असू शकतात. तसेच अल्-कायदा भारतीय उपखंडातील देशांमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचत आहे. या संघटनेचे भारत, पाक, बांगलादेश आणि म्यानमार मध्ये १०० ते १५० आतंकवादी आहेत, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालातून देण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात