Menu Close

इस्लामला प्रतिकात्मक उपासना अमान्य आणि ‘ऑनलाईन’ शब्द हा इस्लामिक शरीयतमध्ये हस्तक्षेप : नसीम खान, काँग्रेस

‘ऑनलाईन’ बकरे खरेदी आणि प्रतिकात्मक कुर्बानी करण्याच्या शासनाच्या आवाहनाला मुसलमानांकडून विरोध

  • इस्लाममध्ये नमाजासाठी भोंगे लावण्याचाही उल्लेख नाही. असे असतांना राज्यातील अनेक मशिदींवर असलेले भोंगे ‘इस्लामविरोधी’ आहेत; म्हणून आवाज का उठवला जात नाही ?
  • गणेशोत्सव, गोपाळकाला, पंढरपूरची वारी आदी हिंदूंच्या सणांसाठी शासनाने एकत्र न येण्याचे आवाहन केले. त्याचा आदर करत हिंदूंनी त्यांचे पालन केले; मात्र मुसलमान ते मानायला सिद्ध नाहीत. ऊठसूट हिंदूंना राज्यघटनाविरोधी ठरवण्यासाठी लोकशाहीच्या नावाने गळा काढणारे आता कुठे गेले ? आता सर्वधर्मसमभावाप्रमाणे सर्वांना समान न्याय नाही का ? शासनाचा आदेश न मानणार्‍यांना कोणीही पुरो(अधो)गामी समजावण्यासाठी पुढे येत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई : इस्लाम धर्मात कोणतीही उपासना ‘प्रतिकात्मक’ होऊ शकत नाही. ‘प्रतिमात्मक’ शब्द इस्लाममध्ये अनुज्ञेय नाही. प्रतिकात्मक हा शब्द वापरणे, हा शरीयतमध्ये हस्तक्षेप आहे. ‘ऑनलाईन’ शब्दाचा उपयोग केल्यामुळे तो इस्लामिक शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे पत्र काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बकरी ईदच्या निमित्ताने शासनाने घोषित केलेल्या नियमावलीमध्ये बकर्‍यांची खरेदी ‘ऑनलाईन’ करा, तसेच बकर्‍यांची कुर्बानी प्रतिकात्मक करा, असे आवाहन करण्यात आले आहे. याला मुसलमान समाजाकडून विरोध होत असल्याची भूमिका नसीम खान यांनी या पत्रातून मांडली आहे.

या पत्रात नसीम खान यांनी म्हटले आहे की, ‘कुर्बानी’साठी बकरे खरेदी करतांना त्यांची शारीरिक चाचणी करणे आवश्यक असते. एखाद्या बकर्‍याचे छायाचित्र बनवून किंवा पाहून ‘कुर्बानी’ दिली जाऊ शकत नाही. तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने अथवा दूरभाषवरून जनावरे खरेदी करण्यापासून बकरा ‘जबा’ करण्यापर्यंतच्या कोणत्याही सूचना नसल्यामुळे लोकांमध्ये द्विधा निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण मुसलमान समाज आणि मुसलमान संघटना यांच्यामध्ये शासनाविरुद्ध तीव्र रोष निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे मुस्लिम समाजाला त्यांच्या वार्षिक सणापासून वंचित करण्यासारखे आहे. बकरा खरेदी करणे, जतन करणे आणि बकरा जबा करणे यांसाठी शासनाने वेगळ्या मार्गदर्शक सूचना बनवाव्यात. त्या अंतर्गत शारीरिक आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याविषयी दिशादर्शक सूचना द्याव्यात. शासनाकडून स्पष्ट सूचना नसल्यामुळे काही मुसलमान नागरिकांनी बकरे आणले आहेत. (कोरोनाच्या संकटकाळात अशी कृती करणे योग्य आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात काही तक्रारी नोंदवणे चालू झालेले आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था यांची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. (असे बोलून नसीम खान या पत्राच्या माध्यमातून शासनाला धमकीच देत आहेत, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)  

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *