Menu Close

देशाच्या अंतर्गत शत्रूंचा बीमोड केल्याविना देशाच्या बाह्य शत्रूंना पूर्णतः हरवणे अशक्य : (पू.) संदीप आळशी

‘देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्षे झाली, तरी देशातील नक्षलवादी, नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे, पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना सीमेवरील भागांत आश्रय देणारे घरभेदी, ‘भारत तेरे तुकडें हो जायेंगें ।’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देणारे पाकप्रेमी यांसारखे देशद्रोही अजूनही शिल्लक आहेत. देशाच्या अशा अंतर्गत शत्रूंचा बीमोड केल्याविना देशाच्या बाह्य शत्रूंना पूर्णतः हरवणे अशक्य आहे; कारण ‘आपले पूर्वज राजे अन् सेनानी महायोद्धे असतांनाही देशातील फितुरांमुळेच आपण शत्रूंशी झालेल्या लढायांमध्ये पराजित झालो’, हा आपल्या देशाचा इतिहास आहे. इतिहासातून शिकून उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य कृती करणाराच शहाणा मानला जातो. भारताचे सैन्यदल महापराक्रमी आहे. शासनकर्त्यांनी सैन्यशक्तीद्वारे देशाच्या अंतर्गत शत्रूंचा पूर्ण बीमोड करण्याचे धोरण अवलंबावे. यानंतर पाक असो वा चीन, देशाच्या कोणत्याही शत्रूला भारताकडे डोळे वटारून पहाण्याचे धाडस होणार नाही. ‘शासनकर्त्यांनी देशाच्या अंतर्गत अन् बाह्य सुरक्षेसाठी हे करावे’, अशी त्यांना प्रांजळ विनंती !

भावी हिंदु राष्ट्र अंतर्गत आणि बाह्य शत्रूंपासून मुक्त असेल.’

– (पू.) संदीप आळशी (२१.१०.२०१९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *