कुठे एका पक्ष्याचे घरटे वाचवण्यासाठी ३५ दिवस अंधारात रहाणारे सहिष्णु वृत्तीचे हिंदू, तर कुठे केवळ मांस खाण्यासाठी गोमातेची दिवसाढवळ्या क्रूरपणे हत्या करणारे धर्मांध !
चेन्नई : केवळ एका पक्ष्याच्या घरट्यासाठी संपूर्ण गावातील पथदिवे तब्बल ३५ दिवस ठेवल्याची घटना तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील पोथ्थाकुडी या गावात घडली. एका इंग्रजी वृत्तापत्राने याविषयीचे वृत्त दिले आहे.
या वृत्तानुसार, या गावात रहाणारा करूपी राजा या विद्यार्थ्याने त्याच्या घराजवळील पथदिव्यांच्या ‘स्विचबोर्ड’वर एका पक्ष्याने घरटे बांधलेले पाहिले. त्या पक्ष्याने या घरट्यात अंडीही घातली होती. त्यामुळे हे घरटे, तो पक्षी आणि त्याची अंडी वाचवण्यासाठी करूपी राजा याने त्याच्या मित्रपरिवारासमोर वीज बंद ठेवण्याची कल्पना मांडली. तथापि गावातील काही लोकांना एका पक्षासाठी एवढा मोठा निर्णय घेणे पटले नाही. त्यामुळे करूपी याने गावाच्या सरपंचांकडे धाव घेतली आणि त्याने सर्व प्रकार सरपंचांना सांगून वीज बंद ठेवण्याची मागणी केली. शेवटी सरपंचांनी करूपीची मागणी मान्य करत माणुसकी म्हणून पथदिव्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे तब्बल ३५ दिवस या गावातील रस्त्यांवर अंधार होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात