शिखांना गुरुद्वारात प्रवेश न करण्याची धमकी
पाकच्या साहाय्याने भारतात खलिस्तानी आतंकवादी कारवाया करणारे आता गप्प का आहेत ? ते यास विरोध का करत नाहीत ? कि त्यांनी वैचारिक सुंता करून घेतली आहे ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकच्या लाहोर शहरामध्ये असलेला प्राचीन भाई तारू सिंह गुरुद्वारा हा एक मशीद आहे, असे सांगत आता तेथील धर्मांधांनी शिखांना तेथे न येण्याची धमकी दिली आहे. ‘देहली शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. भाई तारू सिंह यांनी मोगल काळात धर्मांतरास विरोध केला होता. त्यामुळे या गुरुद्वाराच्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली होती. या बलीदानामुळे शीख समाजात त्यांचा आदर केला जातो.
१. सिरसा यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना ‘टॅग’ (आपण केलेले ट्वीट ज्या व्यक्तीने पहायला हवे, त्यासाठी त्याच्या खात्याला जोडण्याच्या पद्धतीला ‘टॅग’ म्हणतात) करत ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘जर भाई तारू सिंह यांच्या गुरुद्वाराला काहीही झाले, तर जगभरातील शीख हे सहन करणार नाहीत आणि त्यास विरोध करतील.’
२. सिरसा यांनी भारत सरकारलाही ‘पाककडे हा विषय उपस्थित करावा’, असे आवाहन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात