हवेत गोळीबारही केला
भारतीय नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेलेल्या सीमेवरील नेपाळी पोलिसांना भारताने वेळीच धडा शिकवला नाही, तर उद्या ते भारतियांवर यापेक्षा मोठे आक्रमण करतील. यामुळे भारताने अशांना आताच धडा शिकवणे अपेक्षित !
पाटलीपुत्र : नेपाळी पोलिसांनी एका भारतीय महिलेला अणि तिच्या मुलाला बंधक बनवून मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार येथे घडला. नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिहार राज्यातील चंपारण येथील खरसलावा या भागात एक महिला तिच्या मुलासह गवत कापणीसाठी गेली होती. त्या वेळी पोलिसांनी तिला हटकले. तेव्हा तिने ‘मी भारतीय सीमेत आहे’, असे नेपाळी पोलिसांना सांगितले. यावर चिडलेल्या नेपाळी पोलिसांनी सदर महिला आणि तिच्या मुलाला बंधक बनवून ठेवले आणि मारहाण केली.
यानंतर खरसलावा भागातील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यांनी त्या दोघा भारतियांची सुटका करण्याची मागणी केली. तेव्हा नेपाळी पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात वादावादी झाली. त्यातच नेपाळी नागरिकही तेथे पोचले. तेव्हा नेपाळी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. ही माहिती मिळताच सीमा सुरक्षा दलाच्या अनेक अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी सदर महिला आणि तिचा मुलगा यांना नेपाळी पोलिसांच्या कह्यातून सोडवले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात