- हज यात्रेसाठी मुसलमानेतरांकडून पैसा घेणे, हे ‘हराम’ (निषिद्ध) मानले गेले असतांना हिंदूबहुल भारतात गेली अनेक दशके हज यात्रेसाठी हिंदूंकडून अनुदान घेतांना झाकीर नाईक याला हा ‘हराम’ आठवला नाही का ? धर्मांध सुविधा लाटण्यासाठी शरीयतमधील नियम कसे सोयीनुसार वापरतात, हे जाणा !
- ‘झाकीर नाईक हा धार्मिक आधारावर समाजात भेदभाव आणि तेढ निर्माण करत आहे’, असे आता पुरो(अधो)गामी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, पाकची वकिली करणारी बॉलिवूड टोळी, तसेच ओवैसी, शशी थरूर यांच्यासारखे लोक का म्हणत नाहीत ?
- कुठे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अशी उदात्त अन् व्यापक शिकवण देणारा हिंदु धर्म, तर कुठे इतर धर्माचा द्वेष करायला शिकवणारे अन्य पंथ !
क्वाललंपूर (मलेशिया) : पाक सरकार त्याच्या भूमीत श्रीकृष्ण मंदिर बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करून पाप करत आहे. शरीयत कायद्यानुसार इस्लामी प्रांतात मंदिर बांधणे हराम आहे, असे हिंदुद्वेषी विधान आतंकवाद्यांसाठी ‘प्रेरणास्थान’ असलेला इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याने एका कार्यक्रमात केले.
पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी राजधानी इस्लामाबाद येथे श्रीकृष्ण मंदिर बांधण्यासाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांचे (४ कोटी ४७ सहस्र भारतीय रुपए) अर्थसाहाय्य घोषित केले होते. यावर झाकीर नाईक यास ‘इस्लामी प्रांतात मुसलमान करदात्यांच्या पैशांतून मंदिर बांधले जाऊ शकते का ?’, असा प्रश्न विचारला होता. त्यावर झाकीर याने वरील उत्तर दिले.
याविषयी गरळओक करतांना तो पुढे म्हणाला,
१. एक मुसलमान व्यक्ती मुसलमानेतरांच्या धार्मिक स्थळासाठी पैसे आणि पाठिंबा देऊ शकत नाही. याविषयीचे अनेक फतवेही उपलब्ध आहेत.
२. तरीही जर इस्लामी प्रांतात कुठेे नवे मंदिर किंवा चर्च बांधले गेलेच, तर ते पाडून टाकण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.
३. इस्लामनुसार पूर्वीच बांधलेले मंदिर किंवा चर्च यांचे फारतर रक्षण करता येऊ शकते; पण मंदिर किंवा चर्च नवीन बांधू शकत नाही.
४. मुसलमानेतरांना जर इस्लामी प्रांतात रहायचे असेल, तर त्यांना ‘धिम्मी’ नावाचा करार करावा लागतो, ज्याद्वारे त्यांना संरक्षण देता येऊ शकते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात