गोधन तबेल्यासाठी आणल्याचे सांगून पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
- गोवंश हत्याबंदी कायद्याचे राज्यात तीनतेरा ! धर्मांध हे गोरक्षकांवर आक्रमण करत असतांना पोलीस निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधीतरी करतील का ? अशा पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
- गोरक्षकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर जोपर्यंत सरकार कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत अशी आक्रमणे आणि गोहत्या थांबणे शक्य नाही, हे सरकारने जाणावे !
- धर्मांधांकडून वारंवार होणार्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी हिंदूंना स्वरक्षणार्थ सक्षम होणे अपरिहार्य आहे !
मुंबई : २६ जुलै या दिवशी पालघर जिल्ह्यातील वसई येथील पापडीमधील कब्रस्तानच्या बाजूच्या भूमीत ठेवण्यात आलेले २२ गोवंश आणि २० म्हशी गोरक्षकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या; मात्र या वेळी पोलिसांच्या उपस्थितीतच धर्मांधांच्या जमावाने गोरक्षकांवर आक्रमण करून त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झालेले मानद पशूकल्याण अधिकारी श्री. राजेश पाल आणि श्री. शनि मिश्रा यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. एकीकडे धर्मांधांनी पोलिसांच्या उपस्थितीत गोरक्षकांना मारहाण केली असतांना पोलीस मात्र चौकशी न करताच हे गोधन तबेल्यासाठी आण्ाल्याचे स्पष्टीकरण देऊन आंधळेपणाची भूमिका घेत आहेत. असे करून पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
(गोधन तबेल्यासाठी आणले होते, तर धर्मांधांनी गोरक्षकांवर आक्रमण का केले ? नालासोपारा, पालघर परिसरात वारंवार गोवंशियांच्या हत्या होण्याचे मूळ कारण पोलिसांची कचखाऊ भूमिकाच आहे. असे प्रकार पाहून पोलीस आणि कसायी यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय कुणाला आल्यास त्यात चूक ते काय ? महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही राज्यात उघडपणे गोवंशियांच्या होत असलेल्या हत्या, हे पोलीस आणि शासकीय यंत्रणा यांना लज्जास्पद ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
१. २६ जुलै या दिवशी पापडी येथील कब्रस्तानच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूमीमध्ये या गायी, अन्य गोवंश आणि म्हशी यांना ठेवण्यात आले होते. ही माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी याविषयीची माहिती वसई पोलीस ठाण्यात कळवली. (पोलिसांचे काम हे गोरक्षकांना करावे लागते, असेच चित्र सर्वत्र आढळते ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर आलेल्या एका पोलीस हवालदाराला घेऊन मानद पशूकल्याण अधिकारी श्री. राजेश पाल आणि श्री. शनि मिश्रा हे घटनास्थळी गेले असता धर्मांधांच्या जमावाने या दोघांवर आक्रमण केले. (पोलिसांचा धाक धर्मांधांना नाहीच, हेच यातून सिद्ध होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गोरक्षकांवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कारवाई नाही !
या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही. (अल्पसंख्यांकांवर अत्याचार झाला असता, तर सर्व पुरो(अधो)गाम्यांनी गळा काढून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली असती आणि पोलिसांनीही कुणी तक्रार करण्यापूर्वीच हिंदूंना दोषी ठरवून त्यांना अटक केली असती, हे लक्षात घ्या ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
बकरी ईदनिमित्त गायी कापण्यासाठी आणल्या होत्या का ?, याची पोलिसांनी माहिती घ्यावी ! – नीलेश खोखाणी, मानद पशूकल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन
या प्रकाराची मी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना माहिती दिली; मात्र त्यांनी ही जनावरे दूध काढण्यासाठी आणली असल्याचे सांगितले. (या प्रकरणाचे कोणतेही अन्वेषण न करता पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे असा चुकीचा निष्कर्ष कसा काढतात ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात) एका वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात तबेल्यासाठी जनावरे कशी आणली गेली ?, बकरी ईदनिमित्त मांसासाठी ही आणली नसतील कशावरून ? आम्ही येथे मागील ५ वर्षांपासून गोरक्षणाचे कार्य करत आहोत. मागील मासात या ठिकाणी गायी आणि म्हशी नव्हत्या. आतापर्यंत येथे धाड टाकण्यासाठी गेलेले पोलीस आणि बीट हवालदार यांच्याकडूनही याची माहिती घेता येईल. मागील ३ वर्षांत गोवंशियांची हत्या केल्याप्रकरणी येथे अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. याविषयी पोलिसांनी माहिती घ्यावी, असे मानद पशूकल्याण अधिकारी नीलेश खोखाणी यांनी सांगितले.
चौकशीपूर्वीच गायी तबेल्यासाठी आणल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण
या प्रकरणी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने वसई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना माहिती जाणून घेण्यासाठी दूरभाष केला असता ते म्हणाले, ‘‘येथे तबेला असून त्यासाठी ही जनावरे आणण्यात आली होती. याविषयी आम्ही चौकशी करत आहोत, चौकशी पूर्ण झाल्यावर तुम्हाला माहिती देतो.’’ असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.
उघडपणे गोवंशियांची हत्या चालू असतांना पोलिसांचे दुर्लक्ष !
१८ जुलै या दिवशी नालासोपारा येथील वाजा मोहल्ला येथे काही गोवंश आणण्यात आले होते. याची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांच्या समवेत गोरक्षक वाजा मोहल्ला येथे गेले असता त्या ठिकाणी पोलिसांच्या समोर धर्मांध हे गोरक्षकांवर चालून गेले. गोरक्षकांच्या तोंडावरील ‘मास्क’ काढून त्यांना मारण्याची धमकी दिली. (यापूर्वी धर्मांधांनी वारंवार गोरक्षकांवर आक्रमण करण्याच्या अशा घटना घडलेल्या असतांनाही गोरक्षकांना घेऊन जातांना पोलीस अधिक संख्येने का जात नाहीत ? यावरून ‘पोलिसांना गोवंशियांचे रक्षण करायचेच नाही’, असेच जनतेला वाटते ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
मोकळ्या भूमीवर बांधलेल्या जनावरांच्या भूमीला ‘तबेला’ संबोधून पोलिसांकडून दिशाभूल !
गायी, गोवंशीय आणि म्हशी यांना बांधून ठेवलेली भूमी ‘तबेला’ असल्याचा जावईशोध पोलिसांनी लावला आहे. तसे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्या मोकळ्या भूमीत जनावरांना इतस्ततः बांधून ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडून टाकलेल्या आहेत, तसेच कचराही आहे. या भूमीला ‘तबेला’ असल्याचे सांगून पोलीस कसायांची पाठराखण करत आहेत का ?, असा प्रश्न निर्माण होत आहे. (गोहत्या करणार्या धर्मांधांना पकडण्याची पोलिसांची इच्छाच नसल्याने पोलीस अशी थातूरमातूर कारणे सांगतात, यात आश्चर्य ते काय ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
पोलिसांनी कसायांची भाषा बोलण्याऐवजी कायदेशीर कारवाई करावी ! – श्री. दीप्तेश पाटील, समन्वयक, हिंदू गोवंश रक्षा समिती, नालासोपारा
गोरक्षकांना मिळालेली गोपनीय माहिती आणि त्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने गोरक्षकांनी केलेली पडताळणी, यामध्ये ही सर्व जनावरे येणार्या ईदच्या कुर्बानीसाठीच आणलेली होती, असे स्पष्ट आढळून आले आहे. प्रशासनाला हाताशी घेऊन कसायी ही जनावरे गोठ्यातील असल्याचे म्हणत असले, तरी गोवंशाची छायाचित्र पाहून विषय स्पष्ट होतो. गोठ्यात जनावरे वेगवेगळी बांधली जातात; ही जनावरे एकमेकांना दोरीने घट्ट बांधून ठेवली होती. जनावरे जर गोठ्यात पाळण्यासाठी आणली होती, तर मग गोरक्षकांवर आक्रमण करून मारहाण का करण्यात आली ? १५ दिवसांपूर्वी जेथे एकही जनावर नव्हते, तेथे अचानक ईदच्या वेळी ४० पेक्षा अधिक जनावरे कशी जमा झाली ? गोवंश आणतांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता का करण्यात आली नाही ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वीही या ठिकाणी गोवंशीय आणि गोहत्या यांविरोधात ३-४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने कसायांची भाषा न बोलता कायदेशीर कारवाई करावी. गोवंश आणि अन्य पशू यांना त्वरित गोशाळेत पाठवून द्यावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात