Menu Close

नेपाळमध्ये एकतर्फी प्रेमातून धर्मांधाकडून युवतीवर अ‍ॅसिड आक्रमण

४५ वर्षीय धर्मांधाने त्याच्या सहकार्‍याच्या माध्यमातून केले कृत्य

स्वतःच्या मनाप्रमाणे न झाल्यास धर्मांध किती क्रूर आणि अमानवीपणे वागतात, हे यावरून लक्षात येते !

काठामांडू : एकतर्फी प्रेमातून ४५ वर्षीय धर्मांधाकडून युवतीवर अ‍ॅसिड आक्रमण केल्याची घटना येथे घडली. या आक्रमणात पीडित युवतीचा संपूर्ण तोंडवला भाजला आहे. या प्रकरणी पोलिसांनी युवतीवर अ‍ॅसिड फेकणारा मुन्ना महंमद याला पोलिसांनी २ घंट्यांत अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने ‘मला हे काम महंमद आलम याने करायला सांगितले’, अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आलम यालाही अटक केली. आलमने पोलीस चौकशीत सांगितले की, ‘सदर युवतीवर माझे प्रेम होते; परंतु तिला ते मान्य नव्हते. त्यामुळे मी मुन्ना याला तिच्यावर अ‍ॅसिड फेकण्यास सांगितले.’

पीडित युवती आलमला मानत होती भाऊ !

पीडित युवतीने पोलिसांना सांगितले की, ‘आलम माझ्यावर प्रेम करत होता, हे मला माहीत नाही. मी तर त्याला भाऊ मानत होते.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *