Menu Close

हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या धर्मांधांचा जामीन राजस्थानमधील न्यायालयाने फेटाळला

 हिंदूंना मारहाण, घरांवर दगडफेक, तसेच वाहनांची तोडफोडही केली

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे शासन असल्यानेच तेथील धर्मांधांचे फावले आहे. त्यांना कारवाईचा धाकच उरला नसल्यामुळे ते हिंदुविरोधी कृत्य करू धजावतात. हे चित्र पालटण्याठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • असा प्रकार जर हिंदूंकडून धर्मांधांच्या बाबतीच चुकून जरी झाला असता, तर पुरो(अधो)गामी, धर्मांध, साम्यवादी, डावे, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आदींनी आकाशपाताळ एक केले असते. आता ते याविषयी चकार शब्दही काढणार नाहीत, याची निश्‍चिती बाळगा !

जोधपूर : हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या नदीम खान और इरफान खान या धर्मांधांचा जामीनअर्ज येथील स्थानिक न्यायालयाने फेटाळून लावला. याप्रकणी मुकेश कुमार यांनी धर्मांधांविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार प्रविष्ट केली होती.

या तक्रारीनुसार, ‘जोधपूरमधील मदेरणा वसाहतीतील सरकारी शाळेजवळ ३० ते ४० युवक हातात लाठी-काठी घेऊन आले आणि त्यांनी तेथील फलक फाडून टाकला, तसेच तेथील हिंदूंंना मारहाण केली, तसेच घरांवर दगडफेकही केली. त्यांनी वीजेचे मीटर, तसेच परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. यासह त्यांनी हिंदु देवतांना अत्यंत अशलाघ्य शिव्या दिल्या. याशिवाय यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.’ या प्रकरणी पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फूटेज्’च्या आधारे तपास करून अनेकांना कह्यात घेतले, तसेच दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.

(म्हणे) ‘हे किरकोळ भांडण होते !’ – आरोपींचा जामीनअर्जात दावा

धर्मांधांना हे ‘किरकोळ’ भांडण वाटत असेल, तर ‘खरे’ भांडण आणखी काय आणि कसे असेल ?, याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे !

स्वतःच्या सुटकेसाठी न्यायालयात करण्यात आलेल्या जामीनअर्जात आरोपींनी ‘हे किरकोळ भांडण होते’, असे न्यायालयाला सांगितले; परंतु न्यायालयाने त्यांचे म्हणणे अमान्य करत त्यांचा जामीनअर्ज फेटाळून लावला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *