फोंडा (गोवा) : येथील ‘ड्रीम डेकोर गोवा’ (dream decor goa) या आस्थापनाने ‘इन्स्टाग्राम’वरील श्री गणेशाचे विडंबन करणार्या मास्कच्या विक्रीचे विज्ञापन केले होते. यावर येथील एका जागरूक हिंदूने अकाऊंट चालकाला संपर्क करून प्रबोधन केल्यावर त्यांनी क्षमा मागितली आणि ‘इन्स्टाग्राम’वरून चित्र त्वरित हटवले.
प्रारंभी उत्पादक मालकाने ‘हे चित्र ग्राहकाच्या मागणीवरून घातले आहे’, असे सांगून स्वतःचे दायित्व झटकले आणि चित्र हटवायला सिद्ध झाला नाही. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठाने त्यांना ‘देवतांचे विडंबन कसे होते ?’ याविषयी प्रबोधन केल्यावर ‘इन्स्टाग्राम’वरून चित्र हटवले गेले. (मास्कवर देवतांच्या चित्रांची मागणी करणारे स्वतःला हिंदु म्हणवू शकतात का ? ही मागणी पुरवणारेही केवळ जन्माने हिंदु म्हणता येतील. देवता या देवघरात, मंदिरात पूजल्या जातात. त्यांचे चित्र असे कुठल्याही गोष्टीवर स्वतःच्या व्यावसायिक लाभासाठी छापूणे योग्य आहे का ? अन्य धर्मीय असे कधी करतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात