कोल्हापूर : ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा करणारे लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभा केला. दैनिक ‘केसरी’च्या माध्यमातून इंग्रजांच्या अन्यायी राजवटीच्या विरोधात आसूड ओढले. यामुळे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षाही भोगावी लागली. सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया लोकमान्य टिळक यांनीच रचला. इंग्रजांशी लढा दिल्यानंतर आपल्याला स्वराज्य मिळाले; मात्र सध्या देश अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. युवकांनो, अशा स्थितीत लोकमान्य टिळक यांचा आदर्श समोर ठेवून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी निर्धार करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. समितीच्या वतीने नियमित ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतात. या वर्गातील, त्यांच्या संपर्कातील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने २३ जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याचा लाभ कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्यांतील ९२ जणांनी घेतला. या वेळी अनेकांनी सातत्याने असे प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली.
लोकमान्य टिळक यांचा आदर्श समोर ठेवून स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्याचा निर्धार करूया : किरण दुसे
Tags : Hindu Janajagruti Samiti