सीबीआयचे माजी प्रमुख एम्. नागेश्वर राव यांचे मत
- इस्लामी आक्रमकांचा रक्तरंजित इतिहास दडपला !
- राव यांचा दावा चुकीचा नाही. काँग्रेस आणि अन्य पुरो(अधो)गामी राज्यकर्त्यांच्या काळात हिंदूंना त्यांच्या पराक्रमाचा, त्यांच्या महनीय संस्कृतीचा इतिहास कधीच शिकवला गेला नाही. तसेच इस्लामी आक्रमणांचा इतिहास दडपून ‘अकबर महान होता’, असेच शिकवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप आदींचे शौर्य लपवण्यात आले. अजूनही काही प्रमाणात तिच स्थिती आहे, हे हिंदूंचे दुर्दैव !
- इतिहासाची मोडतोड करून युवा पिढी दिशाहीन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार पावले उचलणार का ?
- राव यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकार्यांकडे समाज आशेने पहात असतो. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली ही माहिती तात्काळ समाजासमोर मांडणे जनतेला अपेक्षित होते !
नवी देहली : स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शिक्षणमंत्र्यांनी भारताच्या इतिहासाची मोडतोड केली. यात भारतातील इस्लामी आक्रमणाचा खुनी इतिहास काढून टाकण्यात आला, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) माजी संचालक एम्. नागेश्वर राव यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये केले आहे. ‘स्टोरी ऑफ प्रोजेक्ट अब्राहमिजेशन ऑफ हिंदु सिविलायजेशन’ (Story of Project Abrahmisation of Hindu Civilization) या नावाने राव यांनी ही पोस्ट लिहिली आहे
नागेश्वर राव यांनी स्वातंत्र्यानंतरच्या ३० वर्षांतील शिक्षणमंत्र्यांवरही टीका केली आहे. यात त्यांनी मौलाना अबुल कलाम आझाद (शिक्षणमंत्री असल्याचा कार्यकाळ – वर्ष १९४७ ते वर्ष १९५८), हुमायू कबीर, एम्.सी. छागला आणि फखरुद्दीन अली अहमद (वर्ष १९६३ ते वर्ष १९६७), तसेच नुरुल हसन (वर्ष १९७२ ते वर्ष १९७७) यांची नावे दिली आहेत. तसेच ‘त्यांच्यानंतर १० वर्षे व्ही.के.आर्.व्ही. राव यांच्यासारखे साम्यवादी शिक्षणमंत्री होते. यांनी प्रारंभी इतिहासाची मोडतोड केली’, असे राव यांनी म्हटले आहे.
राव यांनी पुढे म्हटले आहे की, ‘आपण ‘सत्यमेव जयति’विषयी आग्रही आहोत का ?’ बहुतेक नाही. आपल्याला राजनैतिक शुद्धतेच्या नावावर खोटे शिकवले जाते. आपण आपल्या शिक्षणाच्या प्रारंभी जे शिकतो ते खोटेपणाची परिसीमा असते.
नागेश्वर राव यांनी मांडलेली ६ सूत्रे
१. हिंदूंना त्यांच्या ज्ञानापासून दूर करणे
२. हिंदु धर्माला अंधविश्वासाचा संग्रह असल्याच्या रूपात स्थापित करणे
३. शिक्षणातून देण्यात येणार्या माहितीची मोडतोड
४. प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन यांद्वारे हिंदु धर्मावर टीका करणे
५. हिंदूंना ते ‘हिंदू’ असल्याविषयी लाज वाटावी, असे करणे
६. हिंदु धर्मानुसार आचरण केल्यास हिंदु समाज नष्ट होतो, असे दर्शवणे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात