हिंदु जनजागृती समितीतर्फे उत्तर भारतामध्ये एक दिवसीय ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशन पार पडले
देहली : स्वातंत्र्यलढ्यामध्ये अधिवक्त्यांचे मोठे योगदान होते. त्याच प्रकारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी त्यांचे यथोचित योगदान द्यावे. कोरोनासारख्या संकटामुळे सामाजिक अंतर ठेवूया; परंतु सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून आपले कार्य चालू राहील. या अधिवेशनामुळे आमच्यातील एकमेकांमधील जवळीक वाढायला साहाय्य होईल. येणारा आपत्काळ अधिक भीषण आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी सर्व अधिवक्त्यांनी त्यांच्या साधनेचे बळ वाढवले पाहिजे. आपल्या समोर हिंदूंवर आघात होत असतांना त्याच्या विरोधात सर्वांनी संघटित भावाने उभे रहाणे आवश्यक आहे. आज कोरोना महामारीमुळे अनेक लोक तणावग्रस्त बनत आहेत. ‘तणाव कसा दूर करावा ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समिती एका कार्यशाळेचे आयोजन करत आहे. आपणही सर्वजण या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित एक दिवसीय ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करत होते. या अधिवेशनाला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही संबोधित केले. या अधिवेशनाचा लाभ उत्तरप्रदेश, देहली, हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांतील अधिवक्त्यांनी घेतला.
हिंदुविरोधी षड्यंत्र कायदेशीर मागार्र्ने हाणून पाडले पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
हिंदुत्वनिष्ठ संघटना, मंदिर किंवा हिंदूंच्या परंपरा या सर्व कार्यामध्ये राज्यघटनेच्या आडून अडचणी निर्माण करण्याचे काम साम्यवादी संघटना करत आहेत. अशा संघटनांचा भ्रष्टाचार उघड करण्याचे कार्य हिंदु विधीज्ञ परिषद करत आहे. माहिती अधिकाराचा उपयोग करून साम्यवाद्यांचा भ्रष्टाचार परिषदेने उघड केला आहे. सर्व अधिवक्त्यांनी पुढे येऊन सनदशीर मार्गाने साम्यवादी निधर्मींच्या षड्यंत्राचा बुरखा फाडला पाहिजे.
‘महंमद’ चित्रपटाच्या विरोधात आज जगभरातील मुसलमान संघटित होऊन विरोध करत आहेत. त्याचप्रमाणे हिंदूंनी संघटित होऊन ‘वेब सिरीज’च्या माध्यमातून होत असलेला देवतांचा अवमान, ‘अल्ट बालाजी’कडून होणारा भारतीय सैनिकांचा अपमान आणि आतंकवादाला प्रोत्साहन देणारे चित्रपट यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी सर्व अधिवक्त्यांनी त्यांच्या क्षेत्रात कार्य करावे.
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून अधिवक्त्यांनी संघटितपणे कार्य करावे ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
अधिवक्त्यांनी संघटित होऊन कार्य केले, तर धर्मविरोधी शक्तींवर परिणामकारक प्रतिबंध लावता येऊ शकतो. मुंबईचे अधिवक्ते संघटित झाले आणि हिंदुविरोधी झाकीर नाईकला देश सोडून पळावे लागले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत अधिवक्त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. यासाठी सर्व अधिवक्त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून संघटित होऊन कार्य करावे.
अधिवक्त्यांचे अनुभव कथन
१. अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय : वक्फ बोर्ड भारताच्या कोणत्याही मशिदीच्या संपत्तीला ‘वक्फची संपत्ती’ म्हणून घोषित करू शकते; परंतु असा अधिकार हिंदूंना नाही.
२. अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय : देशात हलाल अर्थव्यवस्था उभी रहात आहे. हिंदु स्थळांचे इस्लामीकरण करण्यात येत आहे. अशा अनेक हिंदुविरोधी कार्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर कारवाईबरोबर समाज प्रबोधनही आवश्यक आहे. हिंदु समाजाच्या दु:स्थिती सुधारण्यासाठी अधिवक्त्यांचे मोठे दायित्व आहे.