Menu Close

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मुलाकडून श्री दुर्गादेवीचा अवमान : भारतियांच्या विरोधानंतर क्षमायाचना

जेरूसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा २९ वर्षीय मुलगा यायर याने टि्वटरद्वारे श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र प्रसारित करून देवीचा अवमान केला.  यावर इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत हे चित्र त्वरित हटवण्याची मागणी केली. यावर यायर याने हे विडंबनात्मक चित्र हटवून भारतियांची क्षमायाचना केली.

यायर याने या ट्वीट केलेल्या श्री दुर्गादेवीच्या चित्रात देवीच्या तोंडवळ्याऐवजी लिएट बेन एरी यांचा तोंडवळाल लावला होता. एरी या बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यात अधिवक्त्या आहेत. यायर म्हणाला की, ‘मी हे चित्र संकेतस्थळावरून घेतले होते. मला माहीत नव्हते की, या चित्राद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील. याविषयी मला माझ्या भारतीय मित्रांकडून प्रतिक्रिया आल्यानंतर मला हे समजले. त्यानंतर मी हे चित्र त्वरित काढून क्षमायाचना केली.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *