पोलिसांकडून चौकशी चालू
गोतस्करांच्या विरोधात कर्नाटकमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे त्यांची अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. गोहत्यबंदी कायदा केल्यामुळे गोहत्या थांबत नाही, तर कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाल्यावरच ती थांबू शकते, हे सरकार, प्रशासन आणि पोलीस केव्हा लक्षात घेणार ?
मंगळुरू (कर्नाटक) : गोतस्करांना पोलिसांच्या स्वाधीन करण्याविषयी सांगणार्या दक्षिण कन्नड जिल्हाधिकारी सिंधु बी. रूपेश यांना सामाजिक माध्यमांद्वारे हत्येची धमकी देण्यात आली आहे.
१. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सिंधु बी. रूपेश यांनी सांगितले की, ‘गोतस्करी करणार्यांना पकडल्यावर पोलिसांच्या स्वाधीन करावे. जनसामान्यांनी कायदा हातात घेऊ नये.’ एवढेच नव्हे, तर गायींची ने-आण करणार्या वाहनांवर आणि लोकांवर आक्रमण करणार्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
२. जिल्हाधिकार्यांच्या या आवाहनाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ‘जिल्हाधिकार्यांची हत्या केला पाहिजे’, अशी तुळू भाषेमधील ‘पोस्ट’ एका व्हॉॅट्सअॅप गटामध्ये प्रसिद्ध होऊन ती सर्वत्र प्रसारित झाली.
चौकशी करत आहोत ! – पोलीस
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कायदा-सुव्यवस्था विभागाचे पोलीस उप आयुक्त अरुणांशगिरी म्हणाले की, ‘याविषयी चौकशीला प्रारंभ झाला असून जिल्हाधिकार्यांशी बोलणे झाले आहे. तक्रार दिल्यास त्याचा स्वीकार करू आणि न दिल्यास स्वतःहून तक्रार प्रविष्ट करू. कोणत्याही कारणाने या धमकीकडे दुर्लक्ष करणार नाही.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात