चीनच्या महत्त्वाकांक्षेमुळे तो सर्वच देशांना त्यांच्या मुठीत घेऊ इच्छित आहे; म्हणूनच तो अशी आवाहने करत आहे, हे या देशांनी लक्षात ठेवावे !
बीजिंग (चीन) : कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी चीनसमवेत यावे, असे आवाहन चीनने केले आहे. याशिवाय नेपाळ आणि अफगाणिस्तान यांनी पाकसारखे बनावे, असेही आवाहन त्याने केले. पाक आणि चीन यांच्यात आर्थिक महामार्ग बनत आहे, त्यात नेपाळ अन् अफगाणिस्तान यांनीही सहभागी व्हावे, असे चीनला वाटते.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळ या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी पहिल्या संयुक्त ‘डिजिटल’ बैठकीत बोलतांना हे आवाहन केले. या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावर, अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यावर, तसेच ‘बी.आर्.आय.’ (बेल्ट अँड रोड इनेशिटीव्ह) पायाभूत सुविधा प्रकल्प प्रारंभ करण्याच्या ४ कलमी योजनेवर चर्चा करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात