Menu Close

ब्रिटनमध्ये धर्मांधांनी ४० वर्षांत किमान ५ लाख काफिर महिलांवर बलात्कार केले : पीडित महिलेची माहिती

  • अशांना शरीयतनुसार हात-पाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • याविषयी पुरोगामी, प्रसारमाध्यमे, धर्मांध, मानवाधिकार आयोग एका शब्दाने बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

लंडन : ब्रिटनमध्ये धर्मांधांनी मागील ४० वर्षांत किमान ५ लाख काफिर महिलांवर बलात्कार केले असल्याची माहिती एका बलात्कारपीडित महिलेने ‘ट्रिग्नॉमेट्री’ला दिलेल्या एका मुलाखतीत दिली. ही महिला व्यवसायाने डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

२० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे कथन करतांना ती म्हणाली की, ‘माझी ओळख एका पाकिस्तानी मुलाशी झाली. त्याने प्रेमाचे नाटक केले. त्याने मला रॉदरहैम, शेफील्ड आणि ब्रॅडफोर्ड येथील परिसरांतील वेगवेगळ्या सदानिकेत नेऊन तेथे माझ्यावर बलात्कार केला. त्याने माझा आतोनात छळ करून मला असाहाय्य वेदना दिल्या. या वेदनांतून बाहेर यायला मला १ वर्ष लागला. त्याने माझ्या आई-वडिलांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. अनेकदा पोलिसांकडे दाद मागितली; पण पोलिसांनी ‘आम्ही काहीही करू शकत नाही’, असे सांगितले. त्यामुळे तो करत असलेले अत्याचार चूपचाप सहन करण्यापलीकडे माझ्याकडे दुसरे गत्यंतर नव्हते. मी ख्रिस्ती होते. त्यावर तो ‘तुझे अंग पूर्ण झाकलेले नसल्याने तुझ्यावर बलात्कार करणे, हा माझा हक्क आहे’, असे मला सांगत असे. एकदा मी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्या मित्रांसमवेत माझा पाठलाग केला आणि मला जीवे मारून टाकण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा पोलिसांनी मला नाव पालटून दुसर्‍या शहरात जाण्याचा सल्ला दिला. तसे केल्यामुळे आज मी जिवंत आहे.’

पूर्ण ब्रिटेनमध्ये अस्तित्वात आहे ‘ग्रूमिंग ग्रूप !’

सदर पीडितेने सांगितले की, ‘या ‘ग्रूमिंग ग्रूप’ने ब्रिटेनमध्ये सर्वत्र हातपाय पसरले आहेत. ‘काफिरांच्या महिलांवर बलात्कार करणे’, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. ते प्रामुख्याने अल्प वयातील मुलींना लक्ष्य बनवतात. याशिवाय तरुण आणि वयोवृद्ध महिलांवरही ते त्यांची शिकार बनवतात.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *