अफगाणिस्तानातून भारतात आणण्यात आली ११ शीख कुटुंबे
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी, डावे, साम्यवादी, समाजवादी, प्रसारमाध्यमे, धर्मांध आता याविषयी चकार शब्द न काढता बिळात जाऊन बसतील, याची निश्चिती बाळगा !
नवी देहली : तालिबानी आतंकवादी मला झाडाला बांधून माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणत होते, अशी व्यथा अफगाणिस्तानमधील गुरुद्वारातून आतंकवाद्यांनी अपहरण केलेले अन् नंतर सुटका केलेले शीख नेते निधान सिंह सचदेवा यांनी मांडली. केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून ११ शीख कुटुंबांना भारतात आणले. या वेळी ते बोलत होते. भारतभूमीवर पाय ठेवताच हे सर्व जण भावूक झाले होते. ‘भारत माझ्यासाठी आई-वडिलांप्रमाणे आहे. भारत शेवटी भारतच आहे. भारतात कसलीच कमी नाही’, असे सचदेवा यांनी सांगितले.
तालिबानी आतंकवाद्यांच्या कृत्यांविषयी माहिती देतांना सचदेवा पुढे म्हणाले, ‘‘आतंकवाद्यांनी एक मासापूर्वी माझे अपहरण केल्यानंतर २० घंट्यांतच त्यांनी मला रक्तबंबाळ केले. मला प्रतिदिन मारले जात होते. मला एका झाडाला बांधून मुसलमान बनण्यास सांगितले जात होते; परंतु मी त्यास ठामपणे नकार देत होतो. ‘मला माझा धर्म असतांना मी का धर्मांतर करू ?’, असा प्रश्न मीच त्यांना विचारत असे. अफगाणिस्तानमधील अल्पसंख्य हिंदू आणि शीख यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. आम्ही कुणीही तेथे अजिबात सुरक्षित नाही.’’ सचदेवा यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या पत्नीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून सचदेवा यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. सचदेवा यांच्यासह एक १६ वर्षीय मुलीलाही भारतात आणण्यात आले आहे. तालिबानी आतंकवाद्यांनी तिचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केले, तसेच निकाह लावून दिला होता. केंद्र सरकारने तिचीही सुटका केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात