भारताला शह देण्याचा प्रयत्न
भारताच्या शेजारी राष्ट्रांना चिथावणार्या कुरापतखोर चीनला सरकारने त्याला समजेल, अशा भाषेत उत्तर द्यावे !
काठमांडू : चीनने नेपाळमधील ल्हासा ते काठमांडूपर्यंत रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. या प्रकल्पाचा व्यय ३० कोटी डॉलर्स इतका आहे. हा रेल्वेप्रकल्प भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीलाही जोडला जाणार आहे. चिनी माध्यमांनी या रेल्वे प्रकल्पाच्या पहाणीची छायाचित्रे प्रसिद्ध केली. नेपाळ आणि भारत यांच्यात सीमेवरील तणाव चालू असतांना चीन या प्रकल्पाद्वारे नेपाळवरील त्याची पकड आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनने २७ जुलै या दिवशी पाकिस्तान, नेपाळ आणि अफगाणिस्तान या देशांसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक घेऊन त्यात कोरोना महामारी आणि ‘बेल्ट अँन्ड रोड प्रकल्पा’वरील सहकार्याविषयी चर्चा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात