बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथील हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग
कोलकाता : हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाशी जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांची एक ‘ऑनलाईन’ बैठक समितीने नुकतीच आयोजित केली होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. समितीच्या कार्याचा परिचय समितीचे श्री. सुमंत देबनाथ यांनी करून दिला आणि राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या कार्यात सहभागी होण्याचे उपस्थितांना आवाहन केले. समितीचे ‘ऑनलाईन’ सत्संग आणि धर्मसंवाद या कार्यक्रमांविषयी अधिवक्ता सुगंधा यांनी माहिती दिली. या बैठकीला बंगाल, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.