Menu Close

ईशनिंदेचा आरोप असणार्‍या नागरिकाची पाकमध्ये भर न्यायालयात गोळ्या झाडून हत्या

कुठे स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान जराही सहन न करणारे पाकमधील मुसलमान, तर कुठे चित्रपट, नाटक, विज्ञापन, साहित्य आदींच्या माध्यमांतून वारंवार हिंदु देवतांचे विडंबन होऊनही त्याविषयी साधा शाब्दिक निषेधही व्यक्त न करणारे निद्रिस्त हिंदू !

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकच्या पेशावर शहरामधील एका न्यायालयात ईशनिंदेच्या प्रकरणी अमेरिकी नागरिकावर चाललेल्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गोळ्या झाडणार्‍या खालिद खान याला तात्काळ अटक केली. येथे कडक सुरक्षा असतांना खान येथे कसा पोचला ?, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

ताहिर शमीम अहमद असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वतः पैगंबर असल्याचा दावा केल्याच्या प्रकरणी ताहिर अहमद यास २ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *