Menu Close

‘इमाम-ए-हिंद’ म्हणून प्रभु श्रीरामांचा अवमान करणार्‍या फैज खान यांनी जाहीर माफी मागावी !

मोहम्मद फैज खान यांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करावा आणि अयोध्येत माती आणण्याचा अट्टाहास सोडून माघार घ्यावी ! – हिंदु जनजागृती समिती

अनेक हिंदूंनी दिलेल्या प्राणांच्या आहुती, शेकडो वर्षांचा संघर्ष आणि तब्बल ५०० वर्षे करावी लागलेली प्रतिक्षा, यानंतर प्रभु श्रीरामांच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्याचा शुभारंभ ५ ऑगस्ट यादिवशी श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे होत आहे. हा क्षण संपूर्ण हिंदु समाजासाठी अतिशय आनंदाचा आहे. आक्रमणकर्त्या बाबराच्या प्रतिकांना तिलांजली देऊन भारतीय मुसलमानांनी प्रभु श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी यापूर्वीच सहकार्य केले असते, तर हा संघर्ष टाळता आला असता. उलट मुसलमान समाजाने विरोधाचाच पवित्रा घेतला. त्यानंतरही आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकशाही प्रक्रियेने मंदिर निर्माण होत आहे. आता पुन्हा मुसलमान समाजातील व्यक्तीने श्रीराम मंदिराच्या शिलान्यासाकरिता माती आणण्याच्या आग्रहामुळे वाद निर्माण झाला आहे. आजवर राम मंदिराला मुसलमानांनी केलेल्या विरोधामुळे या कृतीबाबत हिंदूंच्या मनात विरोधाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मोहम्मद फैज खान यांच्या भावना पवित्र असतील, ते रामभक्त असतील, असे जरी एक वेळ मानले, तरी त्यांनी या वेळी सर्वप्रथम हिंदु समाजाच्या भावनांना आदर करायला हवा. त्यामुळे मोहम्मद फैज खान यांनी या प्रकरणी श्रीरामजन्मभूमी येथील भूमीपूजनाच्या महत्कार्याला कोणतेही गालबोट लागू नये, या ठिकाणी कोणताही वाद आपल्यामुळे निर्माण होऊ नये, असे पहावे. याकरता फैज खान यांनी भूमीपूजनासाठी माती आणण्याचा अट्टाहास सोडून माघार घ्यावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.

प्रभू श्रीरामांना ‘इमाम-ए-हिंद’ म्हणणे, हा त्यांचा अवमानच !

मोहम्मद फैज खान यांच्या सोशल मीडियातील ‘पोस्ट’मध्ये प्रभु श्रीरामांचा उल्लेख ‘इमाम-ए-हिन्द’ असा केला आहे. ‘इमाम’ म्हणजे ‘जे नमाजपठण करतात, इस्लाम मानतात आणि त्यानुसार आचरण करतात ते’ ! प्रभु श्रीराम ना नमाजपठण करणारे होते, ना इस्लामचे अनुयायी. इस्लामची स्थापना होण्यापूर्वी लाखो वर्ष आधी त्रेतायुगात प्रभु श्रीरामाचा अवतार झाला. त्यामुळे इस्लाममधील ‘इमाम’चा अर्थ काहीही असला, तरी तो प्रभु श्रीरामांसाठी वापरणे, हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक आदी सर्वदृष्ट्या चुकीचे आहे. याउलट अयोध्येतील श्रीराम मंदिरासह भारतातील सहस्रावधी मंदिरे उद्ध्वस्त करणार्‍या इस्लामी आक्रमकांच्या, मूर्तीपूजा न मानणार्‍या पंथाचे ‘इमाम’ संबोधून फैज खान यांनी प्रभु श्रीरामांचा अवमानच केला आहे. त्यामुळे फैज खान यांनी याबद्दल संपूर्ण हिंदु समाजाची, श्रीरामभक्तांची जाहीर क्षमायाचना करावी, अशाी मागणीही श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *